NC Times

NC Times

कवठेमहांकाळ तालुक्यात मोफत गॅस सिलिंडरची ओढ लागलीया लाडक्या बहिणींना


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :-कवठेमहांकाळ तालुक्यात लाडक्या बहिणीला  'मुख्यमंत्री लाडकी बहिण'  योजनेंतर्गत दरमहा १५०० रुपये भेट अनुदान दिले गेले.काहींना मिळाले तर  काहींची मिळवण्यासाठीची कसरत अद्यापही सुरूच आहे.त्याचबरोबर सरकारने बहिणीला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचीही घोषणा केली खरी परंतु गॅस कनेक्शन हे लाडक्या दाजीच्या नावे असल्याने त्यात अडचण निर्माण झाली आहे.यात काही तडजोड करून दाजीचे नावे असले तरी बहिणीला गॅस सिलिंडर द्या कारण दोघेही एकाच कुटुंबातील असल्याने अडचण दुर होईल अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहेत.
       मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत दरमहा १५०० सुरु केले व गत तीन महिने व आगाऊ दोन महिनेचे पैसे अनुदान बँकेद्वारे पदरी पडले.बहिणीही खुप खुश झालेल्या आहेत.तदनंतर शासन सरकारने पुन्हा तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली.यामुळे बहिणींच्या खुशीत भरच पडली आहे.परंतु गॅस सिलिंडर कनेक्शन दाजीच्या नावे असल्याने मोठी अडचण बहिणीपुढे निर्माण झाली आहे.   
         नामांतर ई केवायसी करण्यासाठीची मोठी झंझटीची अडचण निर्माण झाली असल्याने येथे ही मोठी कसरत करावी लागत आहे.गॅस सिलिंडरचे पुन्हा दरवाढ झाल्याने बहिणीला खर्या अर्थाने गॅस सिलिंडर हवंहवंसं वाटत आहे.मात्र नामांतर ई केवायसीची अडचण निर्माण झाल्याने राज्य सरकार मधील तीनही भावानी ही अडचण दूर करुन दाजीच्या नावे असले तरी कुटुंब एकच असल्याने तीन गॅस सिलिंडर देण्याचे आदेश काढावे अशी मागणी लाडकी बहिणीच्या कडून होत आहे.
        सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत.गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व आता दसरा व दिवाळीउत्सव असे एकामागे एक असे सण उत्सव सुरू झाल्यानें लाडक्या बहिणीला मोफत गॅस सिलिंडरचा बंदोबस्त करावा अशी प्रतिक्षा लाडकी बहिणीला लागली आहे. भावबीज अगोदर ही मोफत सिलिंडर हाती आले तर दिवाळी भावबीज मोठ्या उत्साहाने बहिणीला साजरी करता येईल अशी आशा बहिणीला लागली आहे हे विशेष