NC Times

NC Times

आटपाडीत पिडीत मुलीवर झालेल्या जिवघेण्या हल्याच्या निषेधार्थ पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)- आटपाडी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन बलात्कार पीडीत मुलीवरती शनिवारी संध्याकाळी अज्ञात तीन इसमा कडून धारदार हत्याराने जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता यानंतर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख व स्थानिक नागरिक यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये येऊन सदर घटनेबाबत पोलीस निरीक्षक बहिर यांची भेट घेऊन मुलीची गंभीर दखल घेण्याबाबत सूचना करण्यात आली होती मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे शिवाय नागरिकांनी काही संशयित यांचे नावे सुचवली होती त्याच व्यक्तींना पोलिसांनी आरोपी बनवली आहे त्यामुळे सदरचा तपास हा चुकीच्या दिशेने होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांत केला जात आहे
शिवाय हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून काही अंतरावर धारदार हत्यार कटर मिळाले होते त्या हत्याराच्या आधारे डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा शोध घेणे गरजेचे होते मात्र त्यावेळी असे करण्यात आले नाही
शिवाय घटनास्थळावर मिळालेली कटर या हत्याराचे फॉरेनची तपासणी करून त्याच्यावरील ठसे किंवा त्याचा संग्रह करून ठेवणे ही बाब सुद्धा पोलिसांनी करणे आवश्यक होते परंतु पोलिसांनी घटनास्थळावर असे कोणतेही सोपस्कर पूर्ण केलेले नाही त्यामुळे संपूर्ण प्रकरणांमध्ये पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना असा नागरिकांना संशय येत आहे पोलिसांच्या या भूमिकेमुळे आज बुधवार रोजी सर्व तालुक्यातील नागरिक पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचे निर्णय नागरिकांनी घेतला व मोठ्या संख्येने नागरिक धरणे आंदोलनास पोलीस स्टेशन समोर बसले आहेत यावेळी प्रामुख्याने तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.