NC Times

NC Times

कुची येथील परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या सौ. रुपाली पाटील यांचा 'आदर्श मुख्याध्यापक' पुरस्कारांने सन्मानित


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कुची (ता कवठेमहांकाळ) येथील परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ रुपाली नानासाहेब पाटील यांनी आजवर मुख्याध्यापक म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन च्यावतीने राज्यस्तरीय 'आदर्श मुख्याध्यापक ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या या यशाचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
सौ रुपाली पाटील या उपक्रमशील शिक्षका असुन,त्या विद्यार्थ्यांना एकदा विषय सरळ व सोप्या शब्दात समजण्यासाठी त्या विविध उपक्रमाचा अवलंब करत असतात.विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानबरोबरच व्यवहारी, कलात्मक व क्रीडा क्षेत्राचे ज्ञान देण्यावर त्यांचा नेहमी भर असतो.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन दापोली च्यावतीने खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते व पर्यटन व्यावसायीक महासंघाचे विवेक इदाते,खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोईर,खेडचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना राज्यस्तरीय 'आदर्श मुख्याध्यापक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
      त्यांना याकामी संस्थेचे अध्यक्ष धनंजय शिंदे,सचिव नानासाहेब पाटील व पालकांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.त्यांच्या या यशाचे परिसरातून मोठे कौतुक केले जात आहे.