NC Times

NC Times

आटपाडी महार समुदायक सहकारी शेती संस्था,जमीन,सभासद,वारसाच्या नावे करा!आचारसंहिता पुर्वी न्याय निवाडा करावा! विलास खरात यांची मुख्यमंत्री, महसूल मंत्री, यांच्या कडे मागणी!


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख):7 आटपाडी चे विलास खरात तसेच सभासद, वारसदार यांनी, आटपाडी महार समुदायक सहकारी शेती संस्था ची जमीन सभासद व वारसदार यांच्या नावे करावीत अशी मागणी केली आहे
 जमीन वाटपाच्या फाईलच्या सर्व पुर्तता केलेल्या आहेत, यांचे निवेदन 
.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले आहे -सांगली जिल्ह्यातील आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती संस्था मर्या.आटपाडी ता . आटपाडी जि सांगली या शेती संस्थेची जमीन सभासदांच्या व वारसांच्या नांवे पुर्णदान करणे बाबत.           संदर्भ----जमीन प्रस्ताव क्र.३६९९/३४६/ पुर्ण बांधणी/ ज-५ /महसूल भवन मंत्रालय मुंबई दिनांक १०/११/२०१२.       महोदय, मौजे आटपाडी जि.सांगली येथील जमीन गट नंबर ३४१२,३४१०,३४०९ मधील एकुण क्षेत्र १५६हे.४१आर इतकी जमीन आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती संस्था आटपाडी या संस्थेच्या नांवे आहे सदर संस्था अवसायनात निघालेली आहे परंतु सदर संस्थेची जमीन सभासदांच्या व वारसांच्या कब्जेवहिवाटीत आजमितीस आहे संस्थेची जमीन सभासदांच्या नांवावर नसलेमुळे त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही.सभासद व वारस यांची जमीनीची निकड विचारात घेणेत यावी .तसेच या बाबत शासन कृषी व सहकार विभागाच्या शासन निर्णय क्र.सी.एस.ई/१०७१/१३९७/सी-४ दिनांक ९/१/१९७३मधील धोरणा नुसार संस्थेची जमीन ही सभासद व वारसांना पुर्ण दान करणे बाबत मा.जिल्हाधिकारी सो सांगली यांना आदेश व्हावेत ही नम्र विनंती.संस्थेच्या ५००सभासदाच्या वारसांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी न्याय मिळावा ही अपेक्षा आहे , विलास खरात