NC Times

NC Times

महाबळेश्वर पालिकेचा माझी वसुंधरा' अभियानाचा डंका


नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(शरद झावरे)- महाबळेश्वर पालिकेने  'माझी वसुंधरा अभियान ४.०' मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी केलेली कामे, त्यात ठेवलेले सातत्य याच्या जोरावर महाबळेश्वर नगरपरिषदेला हे यश मिळाले आहे  पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात अनेकविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत होते पालिका अधिकारी व कर्मचारी यांचे अथक परिश्रम व शहरवासीयांची अनमोल अशी साथ यामुळेच हे यश प्राप्त झाले असल्याचे पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
                          राज्य शासनाच्या वतीने 'माझी वसुंधरा' अभियान हे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे या वर्षी अभियानाचा चौथा टप्पा होता या चौथ्या टप्प्यामध्ये प्रथमच पालिकेने राज्यात द्वितीय येण्याचा मान मिळवला असून या स्पर्धा अंतर्गत वर्षभरातील कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार केला जातो त्यानंतर प्रत्यक्ष त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन होते दरम्यान,पालिकेला या बहुमनाबद्दल ०१ कोटी  ७५ लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे या पुरस्काराच्या रकमेतून पर्यावरण संवर्धनाची कामे केली जाणार आहेत माझी वसुंधरा ४.० या उपक्रमातर्गत महाबळेश्वर शहरातील पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या साथीने नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम राबवून शहराचा कायापालट करण्याचे काम घेण्यात आले आहे
                       प्रामुख्याने महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेण्णा तलावातील १९९२ नंतर प्रथमच गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले त्यामुळेच वेण्णा तलावातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे शहरात नवीन हरितपट्टे विकसित करणे, शहरातील विविध ठिकाणी देशी प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण, रोपवाटिकांची निर्मिती, महाबळेश्वर शहरातील लोक जेवविविधतेची नोंद करून अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे वृक्षगणना करून शहरातील हरित अछादानाची टक्केवारी वाढवण्याचा उल्लेखनीय कामगिरी या काळात झाली शहरातील नागरिकांना पर्यावरणपुरक सण व उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहित करणे, पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेण्णा तलाव येथे आकर्षक नवीन बोटींची व्यवस्था करणे, शहरातील पर्यटन स्थळांवर टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतून सेल्फी पॉइंट निर्माण करणे, नुतनीकरण योग्य उर्जा स्रोतांचा वापर करून ई-वाहन चार्जिंग स्टेशन निर्माण करणे, शहरातील सार्वजनिक भिंतींवर आकर्षक, सुबक व माहितीपर चित्रांच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृ‌ती करणे, सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा पंचतत्वं दर्शविणाऱ्या कलात्मक प्रतीकृती उभारण्यात आलेल्या आहेत. या विविध उपक्रमातून स्वच्छ व सुंदर महाबळेश्वरची ओळख टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
               महाबळेश्वर पालिकेने मिळवलेल्या या यशाबद्दल पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
 महाबळेश्वर पालिकेने ''माझी वसुंधरा'' या स्पर्धेत मिळालेल्या यशासाठी शहरावासीयांचे अनमोल सहकार्याबद्दल पालिका  प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले 
वेण्णा तलाव परिसरात पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियानाची जनजागृतीपर लावण्यात आलेले आकर्षक असे फलक