NC Times

NC Times

उमराणी येथे दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता


नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे) - उमराणी येथे सालाबादप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्थान उमराणी यांच्या वतीने नवरात्र उत्सव कालावधीत दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते.दौडचा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या दुर्गामाता दौंडकामी धारकऱ्यांची शिवपाईकांनी व महिला भगिनी तसेच लहान मुलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता.हिदुत्व हेच राष्ट्रीयत्व हिंदुच्या आजच्या तरुण पिढीला रक्तात देशभक्ती धर्मभक्ती निर्माण करण्याचे  कार्य अतिशय प्रेरणादायक उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौंडची आज भक्तीपुर्वक सांगता करण्यात आली अंबामाता मंदिर व बसवेश्वर मुर्तीचे पुजन करुन डफळे सरकार राजवाड्यापासुन सुरुवात करण्यात आली गावातील देवदेवताचे आर्शिवाद घेत असताना उमराणी नगरीतील प्रमुख मार्गावर माता भगिनीनी ध्वजाचे पुजन करीत होते. या कार्यक्रमाची सांगता समारंभ श्री हिदंवी स्वराज्य सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकामध्ये  मोठ्या  उत्साहात संपन्न  झाला कार्यक्रमाच्या शेवटी गावातील श्री शिवप्रतिष्ठाणचे कार्यवाहक डॉ.श्रीवर्धन  शिंदे,,उपसरपंच संजय शिंदे, जय हनुमान सोसायटीचे विद्यमान चेअरमन अमरसिंह इंगोले, डॉ.विनायक शिंदे, यल्लाप्पा अंभगे सर, हणमंत सिंदुर(सर), यांनी दौंड कार्यक्रमाची मार्गदर्शन केले.या दौंड कार्यक्रमासाठी उमराणी गावातील शेकडो धारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.