NC Times

NC Times

तरुणाईला दांडियाचे वेध ! युवतींमध्ये यंदा पुष्पा अन् झमकुडी घागऱ्यांचा ट्रेण्ड


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :- 
देवीची आराधना करण्याचा काळ म्हणजे  'नवरात्रोत्सव'  होय. तरुणाईला वेध लागले ते  'रंगीलो दांडिया' उत्सवाचे.यासाठी खास परिधान केले जाणारे नवीन घागऱ्यात यंदा ‘पुष्पा’ व ‘झमकुडी’ घागऱ्याचा ट्रेण्ड असून, युवतींमध्ये सध्या त्याची क्रेझ आहे.गुजरातहून नवीन घागरे कवठेमहांकाळ शहरात दाखल झाले आहेत असे बोलले जाते.गुजरात राज्यातील अहमदाबाद,सुरत,राजकोट येथून हे नवीन घागरे शहरात दाखल झाले आहेत.
       हे घागरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.याशिवाय भाड्याने घागरे घेण्याची परंपरा आजही कायम असून,यासाठीही घागरे उपलब्ध आहेत.१२ मीटर घेर असलेला 'पुष्पा'  घागरा बाजारात आलेल्या या घागराचे वैशिष्ट्य असे आहे की,याचा घेर १२ मीटरचा आहे.यास हाफ-हाफ घागरा असेही म्हणतात.कारण यात घागऱ्याची अर्धी बाजू ही डिझाईनर तर अर्धी बाजू प्लेन असते.आडव्या कळीचा झमकुडी घागरा ‘झमकुडी’ घागऱ्याचा घेर ७ मीटर असतो.या घागरा सिव्हलेस ब्लाउज त्यावर फुल सिव्हलेस जॉकेट असते.यामध्ये कॉटन कपड्यावर वर्क केलेले असते.याचे वैशिष्ट्य म्हणजे इतर घागरे उभ्या कळीचे असतात.तर झमकुडी घागऱ्याला आडव्या कळी असतात.
         'पाँचो कफतान' घागरा‌ ज्या महिला,तरुणी लठ्ठ आहे. त्यांच्यासाठी ‘पाँचो कफतान’ घागरा आला आहे.प्लेन घागरा, खाली बॉडर (आजरग,पटोला प्रिंटची बॉडर) असलेला घागरा शोभून दिसतो.या घागऱ्यात लठ्ठपणा दिसून येत नाही.
     शेवटच्या चार दिवसात दररोज बरेच घागरे हे विकले जातात.नवरात्रोत्सात सुरुवातीचे पाच दिवस शहरात २०० वर घागरे हे भाड्याने जातात.तर शेवटचे चार दिवस हजारावर घागरे भाड्याने जातात.भाड्याने देण्यात येणारे घागरे त्यांची किंमत दोन हजार ते सात हजार रुपयां दरम्यान असते.हे घागरे डिझाइनर असतात.हे घागरे ५०० ते २ हजार रुपये भाड्याने मिळतात असे व्यापारी वर्गाकडून समजते.