NC Times

NC Times

घाटमाथ्यावर सीताफळास भार,देशी सिताफळ असल्याने आरोग्यास लाभदायक,पण हेच सिताफळ होतंय दुर्लक्षित


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :- कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,तिसंगी, वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर, जाखापुर व कुची परीसरातील डोंगर दर्यात सीताफळाची मोठया प्रमाणात झाडे असून,या झाडाना पावसाळा सपल्यानंतर साधारण सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात भार येतो.केवळ काही कष्टकरी लोकच पिकलेली सीताफळे खाण्यासाठी किंवा विक्रीसाठी बाजारात नेहतात. अन्यथा हे फळ झाडावरच बाद होऊन जाते.
सीताफळ खाणे हे आरोग्यास चांगलेच लाभदायक आसल्याने त्याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते.तेव्हा या परिसरातील अगदी काहीच लोक ही सीताफळे तोडून खाण्यासाठी अथवा ती बाजारात विकुन आपली उपजीविका चालवितात.अन्यथा हे फळ अक्षरशः झाडावरच पिकूनच बाद होऊन जाते.
           कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील दर्याखोर्यात सीताफळाची मोठ्या संख्येने झाडे आहेत.ही सीताफळे ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटी व ऑक्टोबर महिन्यात पिकण्यास सुरवात होतात.सीताफळ खाणे हे आरोग्यासाठी पोषक आहे.अगदी आयुर्वेदिक शास्त्रातही त्याला फार मोठे महत्व आहे.
        सीताफळे चवीला गोड़ व स्वादिस्ट आसल्याने त्याला मागणीही भरपूर असते.कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर या दिवसांमध्ये या डोगरदर्यातून सीताफ़ळे तोडून ती विक्री साठी घेऊन जातात.ती केवळ कमी प्रमाणात.पण बरीच सीताफळे ही काढण्याविना झाडावरच बाद होतात.कारण सिताफळ हे अगदी वजनाने ठणकदार असते.तेही डोंगर दर्यात व ओढा परीसरात ते आणणे ही जिकिरीचं असते.परिपक्व सिताफळ हे तोडल्या नंतर लगेचच पिकते व एकदोन दिवसांतच खपवावे लागते.बाजारात आणलेच तर त्याला भावच मिळत नाही.त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते.अक्षरश: हौशी शेतकर्यांनी सिताफळ लागवड केली पण फार कमी त्यामध्ये यशस्वी झाले.
       डोगर दर्यात जाऊन काही लोक डोळा पडलेले ( म्हणजे पिकण्यास योग्य झालेले फळ) फळे तोडून आणून दुसऱ्या दिवसी जवळील शहरात विक्रीसाठी नेतात.एक कॉरेट सीताफळला चारशे ते पाचशे पर्यत भाव मिळतो.एक जोड़ी साधारण तीन-चार कॉरेट फळे‌ तोड़तात.खर्च वजा जाता एका कॉरेट मागे दीड-दोनशे रुपये मिळतात.चागले मोठ्या सिताफळाच्या कॉरेटला पाचशे रुपयाच्या पुढे भाव मिळतो.काही बांधव पिकेले सीताफळे हे जवळ्याच्या खेडयात जाऊन विक्री करताता.एका सीताफळची क़ीमत तीन ते पाच रुपयांपर्यंत आसते.या विनाखर्च उत्पादनातून येणारे पैशातुन आपला प्रपंच चालविता चालू वर्षी पावसाचे प्रमाणही समाधानकारक आहे.त्यामुळे सीताफळाला भारही चांगला आहे.यावर्षी मोठी आणि दर्जेदार सीताफळ आलेली आहेत.पण भाव नाही व नुसतीच झिंजीट नको म्हणून ती सिताफळे झाडावरच दिसतात हे मात्र खरे.