NC Times

NC Times

"महाबळेश्वर तालुक्याचा अभिमान सोहम शेलार विभागात तिसरा"


नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(शरद झावरे)-: मिरज येथे नुकत्याच पार पडलेल्या शासनमान्य विभाग स्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा 2024/25 मध्ये महाबळेश्वर तालुक्यातील आदर्श स्पोर्ट अकॅडमी पाचगणी व एस, एम, बाथा हायस्कूल पाचगणी येथे इ.सहावी मध्ये शिकणाऱ्या कु. सोहम विशाल शेलार याने 14 वर्षाखालील मुले या गटात तृतीय क्रमांक पटकावला असून सोहमच्या या दमदार कामगिरीमुळे त्याची निवड मुंबई मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
जिद्द, चिकाटी व क्रीडा प्रशिक्षक उमेश भोसले सर यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आजपर्यंत मैदानी खेळांमध्ये पिछाडीवर असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात अशा प्रकारची कामगिरी करणारा सोहम शेलार हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आपल्या नेत्र दीपक कामगिरीमुळे यशाचे  गिरीशिखर गाठणाऱ्या सोहम वर सध्या महाबळेश्वर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव सुरू असून आगामी काळामध्ये क्रीडा प्रशिक्षक श्री उमेश भोसले अनिकेत गोळे व श्री अनिल वने यांच्या मेहनतीमुळे महाबळेश्वर तालुक्याला विविध क्रीडा क्षेत्रामध्ये सुगीचे दिवस येण्याची आशा पल्लवीत झाली आहे..