NC Times

NC Times

तब्बल ४२ वर्षांनी मोघवाडी येथील पुनर्वसित लाभार्थ्यांच्या नावे सातबारे,गावात मोठा आनंदोत्सव,तहसीलदारांच्या कडून मोठा प्रयत्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/ जालिंदर शिंदे :- १९८२ सालापासून रखडलेले व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या ताब्यात असलेले बसाप्पावाडी (ता कवठेमहांकाळ) तलावाचे प्रकल्पग्रस्त व पुनर्वसित पण मोघमवाडी (ता कवठेमहांकाळ) गावचे लाभार्थ्यांचे एकुण १६२ प्लाॅटचे सातबारे व ८ अ चे उतारे हे तहसीलदार अर्चनाताई कापसे यांच्या मोठ्या प्रयत्नातून व आदेशानुसार सदर सातबारे हे लाभार्थ्यांच्या नावावर केल्याने गावात एकच जल्लोष करण्यात आला व सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की १९८२ साली बस्साप्पाचीवाडी तलावाच्या निर्मितीसाठी मोघमवाडी (ता कवठेमहांकाळ) या गावातील अनेक लोकांची घरे व काहींच्या जमीनी या तलावात गेल्याने ते प्रकल्पग्रस्त बनले होते.परंतू त्यावेळी त्यांना जिल्हा पुनर्वसन विभागाकडून गावठाणातील १६३ प्लाॅट दिले होते.परंतू सदरच्या प्लाॅटचे सातबारे हे अद्यापही गावकऱ्यांच्या नावे‌ न होता ते जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या नावेच होते.त्यामुळे संबंधित पुनर्वसताना कोणत्याही शासकीय योजना पासून वंचित रहावे लागत होते.
       या गोष्टींकडे तहसीलदार अर्चनाताई कापसे यांनी सखोलपणे लक्ष घालून त्यांनी तब्बल ४२ वर्षांनंतर आदेशाद्वारे सदरचे सातबारे हे लाभार्थ्यांच्या नावे केले.यावेळी गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व याकामी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार केला.
         यावेळी तहसीलदार अर्चना कापसे,मंडल अधिकारी वैशाली शेंडगे व कबीर सुर्यवंशी, तलाठी राहुल ठाकरे,सरपंच गजानन ओलेकर, उपसरपंच, सुशीला माने ग्रामसेवक दिलीप मोरेसह सर्व सदस्य,गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.