NC Times

NC Times

लोकप्रिय आमदार श्री मकरंद आबांच्या आमदार फंडातून १ कोटी ३८ लाख रुपयाचे विकास कामे आंब्रळ ग्रामपंचायतीस मंजूर




 नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(शरद झावरे)-  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकासरत्न मा. श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांनी अथक परिश्रम घेऊन पाठपुरावा करून . व सरपंच ग्रामपंचायत आंब्रळ व सर्व सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून आंब्रळ गावास निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ आंब्रळ व ग्रामपंचायत आंब्रळ वतीने विशेष आभार मानण्यात आले असुन आज दि. ०४-१०-२४ रोजी आंब्रळ येथे मा. राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री तुकाराम राजाराम आंब्राळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 आमदार फंडा मधून काँक्रीटीकरण रस्ता प्राथमिक शाळा आंब्रळ ते प्रकाश केशव आंब्राळे (घर) रक्कम :- ३० लक्ष , जननी माता मंदिर संरक्षण भिंत रक्कम १० लक्ष , जननी माता मंदिर सभामंडप १२ लक्ष , तसेच बुवासाहेब रस्ता व ओंबळे सरकार रस्ता संरक्षण भिंत व गेनदेव राजाराम आंब्राळे ते महादेव ओंबळे यांच्या कडील जाणारा रस्ता काँक्रीटीकरण या साठी ८६ लक्ष असे १ कोटी ३८ लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी साठी मा. राजेंद्र शेठ राजपूरे यांचे विशेष आभार. या कार्यक्रमाच्या  उपस्थितीत आंब्राळ गावाचे ग्रामसेवक वैभव काळे साहेब ,उपसरपंच श्री .भानुदास बिरामणे,सदस्य सौ. सारिका आंब्राळे, श्री विकास जंगम,  विकास सेवा सोसायटी चे चेअरमन श्री. संतोष आंब्राळे,  संजय आंब्राळे , प्रह्लाद आंब्राळे ,  दिलीप आंब्राळे , गणेश आंब्राळे, आनंदा आंब्राळे , विशाल जाधव , सुहास आंब्राळे, कल्पेश आंब्राळे , मारुती आंब्राळे , सुरेश आंब्राळे व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने श्री राजेंद्र शेठ राजपुरे व जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांचे आभार मानण्यात आले.