NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथील विद्यानगर रस्त्याला तळ्याचे स्वरूप,मार्गस्थ होताना होतीय तारेवरची कसरत


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ येथील मुख्य रस्त्यावरुन‌ व्हाया पोलिस स्टेशन, पंचायत समिती,टेझरी कार्यालय ते विद्यानगरला जाणाऱ्या रस्त्याला पावसामुळे चांगलेच तळ्याचे स्वरूप आले असून,यातून मार्ग काढणे चांंगलेच कसरतीचे ठरत आहे.
नुकतेच या रस्त्याकडील गटारीचे बांधकाम काम झाले आहे.परंतू पावसामुळे पाडलेल्या पाण्याचा येथून तात्काळ निचरा होत नाही.त्यामुळे‌ नागरिकांतून चांगलीच नाराजी व्यक्त केली जात आहे.
        हा रस्ता मोठा रहदारीचा असून,या रस्त्यावरुनच पोलिस स्टेशन,पंचायत समिती,टेझरी कार्यालय,पशुवैद्यकीय दवाखाना,महांकाली हायस्कूल व पुढे पीव्हीपी कॉलेज व कन्या शाळा असल्यामुळे त्याचबरोबर विद्यानगर ही उच्चप्रभूंची रहीवाशांची सोसायटी असल्याने या रस्त्यांवरुन जाणाऱ्या-येणाऱ्यांची येथे नेहमीच वर्दळ असते.