NC Times

NC Times

मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवा-शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून कामाचा मोठा धडाका सुरू केला असून,त्यांनी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजना,वयोवृद्धासाठीची व आरोग्य विषयक लोककल्याणकारी योजना या समाजातील अखेरच्या घटका पर्यंत पोहचवा असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे यांनी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे घेण्यात आलेल्या नुतन तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे (ठाकरे) यांच्या नागरी सत्कारानिमीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.अध्यक्षस्थानी जिल्हा महिला संपर्कप्रमुख सौ सुनिता मोरे होत्या.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की शिवसेना हे मंदिर असून बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे.आणी त्यांच्या विचारांने प्रेरीत होऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक काम करीत आहेत.नुतन शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे हे सुद्धा निष्ठावंत व कडवट शिवसैनिक असुन ते आपल्या कामाने पक्षाची कमान उंचवतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
      यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे व जिल्हा संपर्कप्रमुख सौ सुनिता मोरे यांच्या संयुक्त हस्ते नुतन तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे यांचा यथोचित नागरी सत्कार करण्यात आला.तदनंतर नुतन निवडी करण्यात आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      यावेळी सत्काराला उत्तर देताना नुतन तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे म्हणाले की पक्षाने दिलेल्या संधीचे आपण कामाच्या रुपाने सोने करणार असुन तालुक्यात  'गाव तेथे शाखा व घर तिथे शिवसैनिक'  हे अभियान राबविणार असल्याचे सांगितले.
       प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे,जिल्हा संपर्कप्रमुख सौ सुनिता मोरे,जिल्हा उपप्रमुख आकाश (दादा) माने,महीला जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबिगिरे, तालुका प्रमुख वैशाली चव्हाण, तालुका संघटक वैशाली मुदडे, तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सुतार,मोहन पाटील,अभिजित सुर्यवंशी,शहरप्रमुख शामसुंदर चव्हाण,घाटनांद्रे शाखा प्रमुख सुरेश शिंदे,उपप्रमुख संतोष शिंदेसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत नामदेव शिंदे (गुरुजी) यांनी तर आभार बाळासाहेब शिंदे यांनी मानले.