NC Times

NC Times

वायफळेच्या सौ मिनल पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्रधान




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- वायफळे (ता तासगांव) येथील सौ मिनल मनोज पाटील यांना शिवाजी विद्यापीठाकडून  'मटेरियल सायन्स'  या विषयातून पीएचडी प्रदान करण्यात आली. त्या शिवाजी विद्यापीठातील फिजिक्स डिपार्टमेंटमधील डॉ ए व्ही मोहोळकर यांच्या मार्गदर्शनाखालील  'थीन फिल्म नॅनोमटेरिअल लॅबोरेटरी' मध्ये कार्यरत होत्या.तसेच त्यांनी उर्वरित संशोधन अमेरिकेतील अग्रगण्य  'दि ओहिओ स्टेट यूनिव्हर्सिटी'  येथून डॉ शियू झांग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. डॉ मिनल पाटील यांनी मुख्यत्वेकरून बॅटरीस आणी सुपरकॅपॅसिटर यांची क्षमता वाढवण्यासंबंधीचे संशोधन केले आहे.त्यांच्या पीएचडी डिफेन्ससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील डॉ एच एम  पठाण हे बाह्यपरीक्षक म्हणून उपस्थित होते. 
या संशोधन काळात त्यांना त्यांचे गुरु डॉ ए व्ही मोहोळकर,डॉ के वाय राजपुरे,डॉ पी एस पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले.डॉ मिनल पाटील यांचे माध्यमिक व उच्च माध्यमीक शिक्षण हे अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सदाशीवराव माने विद्यालयात तर पदवीचे शिक्षण हे साताऱ्यातील वाय सी कॉलेज येथून पूर्ण केले.तसेच पुढील पदवीतर शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यापीठातून घेत असतानाच त्यांनी अतिशय स्पर्धात्मक अश्या नेट आणि सेटची परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या.
        तासगाव तालुक्यातील उपळावी गावचे दिलीप गुणवंत पाटील यांच्या त्या जेष्ठ कन्या असून,वायफळे (ता तासगांव ) येथील डॉ मनोज ज्ञानदेव पाटील यांच्या त्या पत्नी होत.सध्या त्या अमेरिकेत स्थायिक आहेत.डॉ मिनल पाटील यांच्या या यशाचे परिसरातून व नातेवाईकांकडून मोठे कौतुक होत आहे.त्यांना याकामी शिक्षक व पालकांचे  बहुमुल्य मार्गदर्शन लाभले.