NC Times

NC Times

संतोष भोसले शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे तालुकाप्रमुख


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- आगळगाव (ता कवठेमहांकाळ) येथील युवा नेते व कट्टर शिवसैनिक संतोष भोसले यांची शिवसेना शिंदे गटाच्या तालुका युवा सेनेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली असून,तश्या आशयाचे पत्र युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांनी संतोष भोसले यांना प्रदान केले.
      कवठेमहांकाळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.सदर बैठकही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती.या बैठकीत तासगांव-कवठेमहंकाळ विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा मतदार संघ असुन,तो यावेळीही शिवसेनाच लढवेल असे एकमताने ठरले.
       संतोष भोसले हे कट्टर व कडवट शिवसैनिक असुन पुर्वीही त्यांनी एकत्रित शिवसेना असताना विभाग प्रमुख म्हणूनही अगदी उठावदार काम केले होते.त्यांनी जनसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी प्रखर आंदोलने छेडली असुन,गरजूसाठी आरोग्य शिबीर,गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर यासारखे सामाजिक उपक्रमही राबविले आहेत.त्याचबरोबर त्यांच्यात आसणार्या उत्तम संघटन कौशल्याचा विचार करूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
    यावेळी बोलताना जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष रोहन जाधव म्हणाले की संतोष भोसले यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्याचा पक्षवाढीसाठी निश्चित फायदा होईल.यासाठी त्यांनी आपले कौशल्यही पणास लावावे तर निवडीनंतर संतोष भोसले म्हणाले की पक्षाने दिलेली जबाबदारी ही आपण अगदी निष्ठेने पार पाडणार असुन वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच युवा सेनेचा घेणार असल्याचे सांगितले.
         यावेळी युवासेनेचे नवीन पदाधिकारीही निवडण्यात आले.यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव पवार,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन जाधव, ज्ञानेश्वर सुतार,अभिजित सुर्यवंशी,मोहन पाटील,तुकाराम गुरव,शुभम कुलकर्णी, बाळासाहेब भोसले,राहुल शेजाळ,संतोष कदमसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.