NC Times

NC Times

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कलाकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-  सांगली जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र खरात  जिल्हा, मा.नवनीत लोंढे अध्यक्ष खानापूर तालुका, तुषार लोंढे जिल्हाध्यक्ष वकील संघटना, चंद्रकांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.प्रथमतः जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात व सांगली जिल्हा संघटक तथा खानापूर तालुका नवनीत लोंढे यांचा कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ तोरणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी सातारा येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या ६७ व्या वर्धापन दिनांस सांगली जिल्ह्यातून कलाकार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले. सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे यांच्या नेतृत्वाखाली हलगी, ढोल, ताशा, वाजंत्री, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.
कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे यांच्या नेतृत्वाखाली कलाकार संघटनेच्या नवीन कार्यकर्त्यांना प्रमुख मान्यवराच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.दिनकर धेंडे यांची अधिकृत निवड करण्यात आली
नियुक्ती दिलेली पोतराज कलावंत व इतर कलाकार पदाधिकारी खालीलप्रमाणे मा.दत्तू वसंत रणदिवे उपाध्यक्ष आटपाडी तालुका,मा.गणेश नंदकुमार मानेआटपाडी तालुका उपाध्यक्ष,मा.नितीन पाटोळे आटपाडी तालुका संघटक, मा.तोफिक दादा साठे कराड तालुका संघटक,मा. दशरथ शामराव मोटे आटपाडी तालुका संघटक,मा.किसन अनंता फाळके सांगोला तालुका उपाध्यक्ष,मा. शिवाजी रंगू तोरणे ज्येष्ठ सल्लागार, मा.अमोल बाळासो सकट कडेगाव तालुका अध्यक्ष,मा. गणेश रवींद्र भिसेकडेगाव तालुका उपाध्यक्ष,मा.धनाजी जगन्नाथ भिसे आटपाडी तालुकाध्यक्ष,मा.शुभांगी धनाजी परीट महिला आघाडी आदी कलाकार यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मा.बाळासाहेब गवंड जिल्हा उपाध्यक्ष, मा.संजय गवंड अध्यक्ष आटपाडी तालुका, मा. आनंदा रामदास लोखंडे खानापूर तालुकाध्यक्ष, मा. सुभाष नामदेव मदने सांगोला तालुका उपाध्यक्ष, मा. सोनू दिलीप साठे कराड तालुका अध्यक्ष, मा.गणेश मंडले खटाव तालुकाध्यक्ष,वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड‌.मा.तुषार लोंढे, सांगली जिल्हा संघटक तथा खानापूर तालुका अध्यक्ष मा.नवनीत लोंढे,सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.चंद्रकांत कांबळे, खानापूर तालुका उपाध्यक्ष मा.सुरेश कांबळे, मा.विवेक सावंत, मा. भिकाजी खरात, मा.शरद वाघमारे यांच्यासह  सांगली, सातारा, सोलापूर,जिल्ह्यातून पोतराज बांधव व इतर कलाकार पदाधिकारी तसेच अंध अपंग कलाकार सुध्दा उपस्थित होते.
________________________