NC Times

NC Times

जत विधानसभा रासप मधून लक्ष्मण पुजारी इच्छुक


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ /वार्ताहर(विजय चौगुले)- 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चा बांधणी सुरू आहे. त्यामुळे जागावाटप झालेली  नसल्याने दृष्टीने वरिष्ठांनी  सर्व जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे. 
पक्षाने महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे .  सामान्यांना न्याय मिळवून सत्तेचे कवाडे त्यांनी खुली केले आहेत . रापसचे  अस्तित्व लक्षवेधी आहे . जानकर साहेबांवर  आजही जिल्ह्यातील लोकांनी मोठे प्रेम असल्याचे सिद्ध झाले आहे . राज्यातील अन्य विधानसभा मतदार संघातही वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली चाचपणी  सुरू आहे.  स्वबळावर  या मतदारसंघातून उमेदवारीसाठी मोर्चा बांधणी सुरू असून जनमताचा कोल घेतला जात आहे. जत विधानसभा रासप मधून लक्ष्मण पुजारी इच्छुक आहेत असे त्यांनी सांगितले.