NC Times

NC Times

ग्रामीण कथाकथनास श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद


नवरात्राच्या निमित्ताने वयगाव तालुका वाई जिल्हा सातारा येथे आयोजित केल्या जाणाऱ्या शारदीय प्रबोधन मालेमध्ये आठव्या दिवसाचे प्रबोधन पुष्प ग्रामीण कथाकार प्रा. संभाजी लावंड सर यांनी प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांच्या माझ्या बापाची पेंड या कथेचे कथा कथन स्वरूपात गुंफले सदर कार्यक्रमास गावातील बाल,तरुण, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती  होती. ग्रामीण  ढंगामध्ये व खुमासदार विनोदी,शैलीत श्री लावंड सरांनी प्रा. द. मा. मिरासदार यांची माझ्या बापाची पेंड या कथेचे सादरीकरण केले. व उपस्थित  श्रोतुवर्गालां खिळवून ठेवले ही कथा सांगत असताना उत्तम अभिनय आवाजातील चढ उतार,दोन व्यक्ती मधील संवाद त्यांनी हुबेहुब कथन केले.ग्रामीण खेडेगाव, तेथील शाळा, मास्तर, गावचे नागरिक आणि खेडवळ वातावरण श्रोतुवर्गाच्या अंतःकरणाला भिडत होते.गावातील जुनी कौलारू,कुडाची,घरे,लाकडी पट्ट्यांच्या  खिडक्या,गायी गुरांचे गोठे, कोंबड्यांचा खूराडी, शाळा बुडवणारी मुले,आणि तेथील मानवी स्वभावाच्यां विविध पैलूंचे हुबेहूब वर्णन ऐकताना, प्रेक्षक रंगून जात होते. घटना,प्रसंग व व्यक्तिचित्रणे स्वभावसह समजत होती, कथेचा ग्रामीण बाज जाग्यावर ठेवून कथा व त्यातील प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्या समोर घडत असल्याचे जाणवत होते.कथानक जसे पुढे जात होते तसे ऐकणारे शब्दाच्या सोबत प्रत्यक्ष कथेमधील पात्रांशी एकरूप होत होते शेवटी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत तसेच डोळ्यांच्या कडा ओलावत संपूर्ण प्रसंग त्यांनी श्रोत्यांसमोर हुबेहुब उभा केला.सदर व्याख्यान मालेत लावंड सरांसोबत इतर सात वक्त्यांनी आपले प्रगल्भ विचार मांडले यामध्ये  कु. श्रुतिका जंगम वयगाव ह. भ. प. विलास महाराज यादव दह्यात न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव या शाळेचे काही विद्यार्थी श्री दिलीप भोसले सर शिरगाव श्री ज्ञानदेव कदम लगडवाडी प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्रीपाद महाराज जाधव सातारा तसेच बावधनचे सुप्रसिद्ध गोंधळी कथाकार श्री अर्जुन लगस यांचा गोंधळी कथेचा कार्यक्रम देखील या प्रबोधन मालेत आयोजित करण्यात आला होता. शेवटी महिलांसाठी जागर स्त्री शक्तीचा खेळ पैठणीचा या खास कार्यक्रमाने या प्रबोधनमालेची सांगता झाली. या कार्यक्रमाचे निवेदन श्री संतोष सुर्यवंशी तसेच श्री अंकुश वाडकर व श्री शंकर वाडकर यांनी केले गणेश सुतार शिवाजी वाडकर पंकज सणस, संतोष केळगणे, विशाल वाडकर, श्री नथुराम वाडकर व श्री शांताराम बापू यांनी या कार्यक्रमाच्या आयोजना करता विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थांनी आर्थिक स्वरूपात भरभरून मदत केली.
विजयादशमीच्या दिवशी वयगाव ग्रामस्थ व जिव्हाळा ग्रुप वयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्या तरुण पिढीचा जाहीर सत्कार करण्यात आला.
   या प्रबोधन मालेचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 24 वर्षापासून ही प्रबोधन माला अखंडित आणि अव्याहतपणे नवरात्रा मध्ये आयोजित केली जाते तसेच ही प्रबोधन माला सातारा जिल्ह्यातील काही मोजक्या प्रबोधनमालेमध्ये गणली जाते इतर गावांनी देखील आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं नियोजन वयगाव ग्रामस्थांनी इतक्या दुर्गम भागात देखील केले होते ही विशेष बाब आहे
श्री. प्रशांत थोरवे.वाई