NC Times

NC Times

भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्व


नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा.संभाजी लावंड सर)-आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे  अध्यक्ष व पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र  मैत्रिणींनो, सर्व प्रथम स्व‌राज्याचे सुराज्य करण्यात मोलाचा वाटा असणारे थोर देशभक्त आबासाहेब वीर यांच्या पवित्र कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन. 
आज मी आपल्यासमोर 'भारतीय संस्कृतीतील सणाचे महत्व' या विष‌यावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तरी हे मनोगत शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती . माझे नाव कुमारी नेहा महेश खाडे असून मी ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजची विद्यार्थीनी  इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. 
आपली भारतीय संस्कृती महान आहे.आपल्या देशावर अनेक पाश्चिमात्य लोकांनी आक्रमणे केली.मंदीरे,फोडली, मूर्ती फोडल्या संपत्ती लुटण्यात आली.यामध्ये संस्कृतील संपवण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतू ती नष्ट झालेली नाही. याला कारण भारतीय संस्कृती ज्या तत्वावर उभी आहे. तो पाया भरभक्कम असल्याने ती प्रत्येक वेळी टिकून राहिलेली आहे.संस्कृती म्हणजे काय ते आपण नीट समजून घेऊ या.
संस्कार व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.संस्कारात चांगल्या आचरण संहीतेची रचना आहे.मानवता हा धर्म आहे.आपण सारे एकच आहोत यामध्ये समानता हा धागा सर्वसमावेशक आहे.अनेक संस्कृती येथे निर्माण झाल्या त्या संस्काराला व संस्कृतीला अध्यात्मिक अशी तेजस्वी परंपरा लाभलेली आहे, कि ती दुसऱ्या अंन्य देशात नाही. भारतीय आर्य व वैदिक लोकांनी जे संस्कृत भाषेमध्ये चार वेद सहा शास्त्रे, रामायण, महाभारत, इतिहास, समाज शास्त्र, अर्थशास्त्र,राजशास्त्र लिहली त्यामध्ये भारतीय संस्कृतीची बीजे सापडतात.ती संस्कृती एकदा का मानवास समजली, की खरे संस्कार
लक्षात येतात व आदराने आपला माथा उन्नत होतो.संस्कृती म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा आरसा आहे, 
संस्कृती मध्ये मानवी नैतिक मुल्यांचा अविष्कार आहे.भारतीय संस्कृती कोणत्याही दुसऱ्या संस्कृतीचा तिरस्कार करत नाही. ती सर्व समावेशक आहे.सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य, धारणा, समाधी, धर्म, अर्थ,काम व मोक्ष हे त्या संस्कृतीचे चार खांबआहेत.अजंठा, वेरूळ,भारतातील शिल्पे,व दगडात, डोंगरात कोरलेली अनेक लेण्यातील, भक्तीमार्गातून संस्कृतीचे व लोकसंस्कृती मनोहर दर्शन घडवते, तसेच गायन, वादन, नृत्य कला, संगीत,अभिनय या सर्व बाजुंनी ती समृध्द पणे आजसुद्धा उभी आहे.ईश्वर प्राप्तीचे मार्ग या संस्कृतीने मानवास दिलेले आहेत. हा त्यातील महत्वाचा घटक आहे.अशा संस्कृतीचे कार्य हे आहे की, आपण सारे एकच आहोत. आपण साऱ्या प्राणीमात्रांना आदराने वागवावे. कोणाचीही निंदा नालस्ती करु नका. सर्वांचा देव एकच आहे. तेव्हा गुण्यागोविंदाने हा समाज एकत्र रहावा म्हणून ऋषीमुनी यांनी मानवी समुदाय एकत्र कसे येतील याचा विचार करुन सण उत्सवांची निर्मिती केली आहे.
बेंदूर:
हा भारतीय संस्कृती तील पहिला सण आहे. कृषी शेतीची मशागत करणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता दाखवण्यासाठी साजरा केला जातो. हडाप्पा मोहिंजदडो संस्कृती पासून बैल पोळा सण साजरा करतात. या दिवशी बैलाला रंगीबेरंगी वस्त्रे अलंकार घालून सजवतात. पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून गावातुन मिरवणूक काढली जाते. 
नागपंचमी:-
निसर्गातील प्राणीमात्रांना आदरव्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. सासरी गेलेल्या मुली माहेरला येतात. नागोबा ची पूजा करतात लाह्या प्रसाद म्हणून वाटतात. 
गौरी गणपती:-
गणपती हा गणांचा अधिपती आहे. पंधरा दिवस त्यांची घरामध्ये पूजन केले जाते.हिरव्या दुर्वा वाहतात. आरती म्हटली जाते. गोड नैवेद्य अर्पण केला जातो. व आशीर्वाद मागितला जातो.
नवरात्र उत्सव
आदिशक्ती :-
म्हणून भारतीय सणामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला 
जातो. देवीची नवविध रुपे व महत्व समजावे यासाठी लोकांना एकत्र आणणारा हा सण आहे. सर्वजन एकत्र येऊन उपासनेचे महत्व पटवून देणारा हा सण आहे. 
दिवाळी:-दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो.  अंधकारावर प्रकाशाचा , अज्ञानावर ज्ञानाचा, वाईटवर चांगल्याचा  विजय दर्शवतो. दिवाळी सणाला विविध धार्मिक , सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक पैलू आहेत. या सणाच्या पाश्र्वभूमीवर विविध कथा आणि श्रध्दा आहेत. उदा. श्रीरामचंद्राचे आयोध्येत पुनरागमण.
मकर संक्रांती:मकरसर हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला साजरा केला जातो आणि उत्तरायण पर्वाची सुरुवात दर्शवितो. मकरसंक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात या सणाचा उद्देश समाजातील  एकता कुटुंबातील स्नेह भाव, आणि आनंद साजरा करणे आहे.
होळी - रंगपंचमी:-रंगाचा आणि जल्लोषाचा हा सण वंसत ऋतूच्या आगमनाचे सूचक आहे. या सणाद्‌वारे लोकांच्या मनातील दुःख, करुणा, वाद-विवाद यांचा अंत करुन  आनंद, स्नेह आणि नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा दिली जाते.
 गुढीपाडवा :-गुढीपाडवा हा एक नवीन सुरुवातीचा,सकारात्म‌कतेचा आणि आशावादाचा सण म्हणून ओळखला जातो.
वटपौर्णिमा:-भारतीय संस्कृ‌तील वटपोर्णिमा हा प्रेमाचे आणि अखंड सौभाग्यचा सण आहे.  सौभाग्याचे प्रतीक मानाला जातो.
आषाढी एकादशी:-
आषाढी एकादशीचा मुख्य उद्दिष्ट मन शुध्दी, संयम, आणि जीवनात चांगळ्या कर्माचा अंगीकार करणे हे आहे.
गोकूळ जन्माष्टमी:-
या सणाद्‌वारे श्रीकृष्णाच्या जीवना तील चातुर्य, प्रेम आणि धर्म रक्षणाचे महत्व अधोरेखीत केले जाते. अशा या विविध सणाचे भारतीय संस्कृतीतील महत्व सांगताना शेवटी मी एक छोटी कविता सादर करेण.
भारत देशाचे सण बाराशे, साजरे करतो आनंदाने सारे।
गुढीपाडव्याने वर्षाची सुरुवात, रामनवमीला प्रभू रामाचा जयघोष ।
दिवाळीचा सण, द्वीपांच्या लडी, मकरसंक्रांतीला, तिळगुळाची गोडी|, 
होळीचा रंग खेळतो रंगबिरंगी 
गणपती येती मोदक घेऊन घरी ।
दसरा सत्याच्या विजय करतो, रक्षाबंधन बहीण-भावाचं प्रेम उधळतो।
ईद येते, मिठाईचा आनंद देत,नववर्षात पोंगल नवा आनंद देतो||
भारतीय सण आनंद देणारे, आपल्यात प्रेम आणि एकता वाढवणारे !
असे आहे  'भारतीय संस्कृतीतील सणाचे महत्व'
कु. नेहा महेश खाडे. इ. ९वी ब
ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल वाई
पसरणी