NC Times

NC Times

मराठी' भाषेची जननी ही 'पाली'-मा.सुनिल कांबळे नवीमुंबई.


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे)- 
नुकतेच केंद्र सरकारने पाली व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला त्याविषयी.
ज्या 'मराठी' भाषेचा उगम 'पाली' भाषेतून झाला,त्या 'माय लेकीला' अर्थात 'पाली' आणि 'मराठी' या भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला या पेक्षा मोठा आनंद काय आहे.महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने सन २०१३ मध्ये 'पाली' आणि 'मराठी' भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून काही अहवाल केंद्र सरकारला सन २०१३ मध्ये सादर केले होते.तेंव्हा केंद्रात युपीए चे सरकार होते.नंतर एनडीए चे सरकार आले.त्या सरकारला 'मोदी सरकार' म्हणूनही संबोधण्यात आले होते.या दोन्ही सरकारने महाराष्ट्रातील लोकांची मातृभाषा 'मराठी' आणि प्राचीन काळापासून चालत आलेली 'पाली' भाषांना अभिजात असल्याचे शिक्कामोर्तब केले.
       'पाली' भाषेचा इतिहास हा प्राचीन आहे.बुद्ध कालीन काळातील गौतम बुद्धांची भाषा म्हणूनही ती ओळखली जाते. महाराष्ट्रात आणि जगभरात पसरलेल्या कोट्यावधी बौद्ध असणा-यांसाठी हा फारच आनंदाचा क्षण आहे.कारण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार याच समृद्ध भाषेतून झाला आहे. जगात बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी उपयुक्त ठरलेली ही पाली भाषा बोलायला सहज आणि सोपी होती.अशा समृद्ध पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही भारतीय नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
           मनुवादी व्यवस्थेच्या साहित्यिकांनी बहिष्कृत केलेली ही भाषा.तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून पाली भाषेचे गाढे अभ्यासक प्रा. भालचंद्र खांडेकर यांनी या भाषेला न्याय देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.त्यांनी पाली भाषेचा केलेला गाढा अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे.त्यांनी पाली भाषेसाठी केलेल्या कार्यामुळे मन आनंदाने आणि अभिमानाने मोहरुन जाते.  त्या शिवाय या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून वकील शैलेश नारनवरे आणि वर्ध्याचे सुधीर भगत यांनी केलेले काम विसरून चालणार नाही. 
     तथागत संघ,सम्यक नागरिक संघ (नागपूर) आणि संविधान परिवार (नागपूर) या संस्थां या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कापरा सारख्या जळल्या.तेंव्हा कुठे या भाषेला आज न्याय मिळाला आहे. तज्ज्ञांच्या समितीच्या माध्यमातून पाली भाषेचा इतिहास आडीच हजार वर्षे मागे नेऊन अहवालात त्याची व्यवस्थित मांडणी करून पाली भाषा ही कशी अतिप्राचीन आहे व तिच्या कार्याची व्यापकता किती इतिहास कालीन आहे.हे सांगणारे अभ्यासक दिवंगत हरी नरके-सर होते.त्यांनी समितीचे काम करत असताना खुप कष्ट घेतले.ते आज आपल्यात नाहीत.मात्र त्यांनी घेतलेली मेहनत आपण विसरता कामा नये.कारण कोणत्याही भाषेचा इतिहास चौफेर तपासणे किंवा तिला योग्य त्या श्रेणीत बसवणे ही गंभीर ज्ञान प्रक्रिया असते आणि ती त्यांनी अतिशय कल्पकतेने तज्ज्ञांच्या समिती मध्ये मांडली.  
          मनुच्या सावटा खाली कार्यरत असणारी अदृश्य परिस्थिती चोहीकडे असताना देखील अतिशय परिश्रम करून पाली या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.हे सहजा सहजी मिळाले नाही.त्याचे स्वागत करायला हवे. यामुळे पाली भाषेला नवी पालवी फुटली आहे.तीला चांगले दिवस आले आहेत.हा दर्जा म्हणजे नवी सुरुवात आहे.धम्माच्या व जगातल्या नागरिकांच्या सर्वांगीक उत्कर्षा साठी पुढच्या ५० वर्षांची कार्यक्रम प्रणाली तयार करायला हवी.पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने केंद्रातून कसे वाढीव केंद्रीय अनुदान या भाषेच्या उत्कर्षासाठी मिळेल या कडे लक्ष द्यावे लागेल.भारताच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यालयात, महाविद्यालयात आणि विद्यापीठात पाली भाषा ही प्रामुख्याने शिकवता यावी या कडे देखील लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे.
        त्या साठी आंदोलन करावे लागले तरी मागे हटता कामा नये.अनेक बुद्ध कालिन ग्रंथ जे मुळ पाली भाषेत आहेत.ते सरकारने प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घ्यावा या करिता प्रयत्नशील राहिले पाहिजे. 'पाली' या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नव्या भारतीय मनालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समृद्ध करण्याच्या दिशेने प्रवास सुरू करुया.हे अभिजात क्षण आपण कसे स्विकारतो या वर सारे अवलंबून आहे.तथागत बुद्धाच्या धम्म प्रसारासाठी भारतच नव्हे तर अखंड जग बौद्धमय करण्यासाठी वापर करुन घ्यावा.या पुढे पाली ही भाषा अनंत काळ चिरायू रहाण्या करीता जागरूक रहावे.तुमची जागरूकता ही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या 'पाली' भाषेला प्रेरणादायी ठरो, हीच कामना.
       शब्दांकन :- जालिंदर शिंदे/घाटनांद्रे.)