NC Times

NC Times

गाव टग्यांकडून होत असलेल्या पिळवणुकी पासून न्याय मिळावा म्हणून गौतम बाबर या दलित व्यक्तीचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)- आटपाडी येथील गौतम बाबर यांच्या नात्यातील एक व्यक्ती दुर्धर आजाराने त्रस्त होती याचा उपचार करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता होती म्हणून त्यांनी त्यांच्या विषयाची जमीन विकायची होती म्हणून त्यांनी नोटरी करून साडेपाच लाख रुपये पैसे घेतले होते मात्र तानाजी नांगरे व पांडुरंग कदम या दोघांनी सदर व्यक्तीच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांची जी जमीन विकलेली नाही त्या जमिनीमध्ये त्यांनी बांधकाम केलेला आहे व बाकीची शिल्लक आहे ती जमीन सुद्धा कुणाला विकू दिली जात नाही त्यामुळे बाबर यांची मोठी अडचण झाली आहे शिवाय मागील वर्षी जे साडेपाच लाख रुपये नोटरी करून दिले आहेत त्या पैशाच्या बदल्यात दहा टक्के व्याजदराने व्याजासह रक्कम परत देण्याचा तगादा लावलेला आहे.
एका बाजूला पहिलेच कर्जाच्या बोजाखाली बाबर कुटुंबीय दबलेला आहे तर वरून गाव टाक्यांनी संपूर्ण जमीन लाटण्याच्या उद्देशाने अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे या पिळवणुकीपासून न्याय मिळावा यासाठी गौतम बाबर यांनी शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केला आहे. 
सदरची पिडीत व्यक्तीसकाळपासून उपोषणाला बसली आहे मात्र प्रशासनातील कोणीही संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे फिरकला नाही आम्ही स्वतः प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करून सदर व्यक्तीची दखल घेण्याबाबत माहिती दिल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं फक्त निवेदन स्वीकारलेला आहे परंतु अद्याप त्यांनी कोणतीही ठोस कारवाही केलेली नाही एकही मागणी वरती ठोस कारवाई होत नसल्याने आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे.