NC Times

NC Times

धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून लवकरच धनगर समाज आरक्षणाच्या विजयाचा भंडारा उधळेल -आमदार गोपीचंद पडळकर


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-  कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी  येथील बिरोबा बनात गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. पडळकर म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण म्हणजे गरीब मराठा समाजाची फसवणूक आहे. ओबीसीतील आरक्षणामुळे गरीब मराठा समाजाचे कल्याण होणार नाही. 2023 च्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात खुल्या प्रवर्गात निम्म्याहून अधिक मुले ओबीसी समाजाची आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास फसवणूक ठरेल महाराष्ट्रात राजकीय स्वार्थासाठी मराठा व ओबीसी असा वाद पेटवला जात आहे. जाती-जातीत भांडणे लावून, तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हाणून पाडा. यावेळी उल्हास धायगुडे, समाधान कोळेकर, दादा लवटे, दौलत शितोळे यांची भाषणे झाली. कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती अजित दादा कारंडे ब्रह्मानंद पडळकर, जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कोळेकर, रामचंद्र पाटील, रावसाहेब कोळेकर, शिदानंद हैबतपुरे व समाजबांधव उपस्थित होते.शरद पवार यांनी 40 वर्षांत काय केले जाती-जातीत भांडणे लावून सत्तेवर येण्याचे शरद पवार यांचे स्वप्न उद्ध्वस्त करा, सत्ता मिळवून महाराष्ट्राचा चेहरा बदलू म्हणणार्‍या शरद पवार यांनी चाळीस वर्षे सत्ता असताना काय केले? असा सवाल पडळकर यांनी केला.यावेळी या दसरा मेळाव्याला असंख्य बहुजन समाज उपस्थित होता