NC Times

NC Times

नांगोळे ग्रामपंचायतीची कोटीची उड्डाणे,वसुंधरा अभियानाचे १ कोटीचे तर भूमी थीमॅटीकचे ५० लाखाचे बक्षीस



नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/(जालिंदर शिंदे):- नांगोळे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असुन यामध्ये त्यांना १ कोटीचे‌ तर भूमी थीमॅटीक मध्येही राज्यात अगदी उत्तम कामगिरी करून त्यामध्येही ५० लाखाचे बक्षीस मिळवून एकुण दिड कोटीचे बक्षीस मिळविले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे.
नांगोळे ग्रामपंचायतीने वसुंधरा अभियानांतर्गत पृथ्वी,अग्नी,वायू,जल व आकाश या पाच तत्वावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.हावा व जल गुणवत्ता, प्लाॅस्टिक बंदी,ध्वनी व वायू प्रदूषण यामध्येही अगदी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.सदर ग्रामपंचायतीने सन २०२१-२२ पासून आज अखेर शासनाच्या विविध प्रकारच्या स्पर्धा ग्रामपंचायत पातळीवर राबवून कोट्यवधीची बक्षिसे मिळविली आहेत.
      ‌ तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजनातुन हे अभियान राबविले त्याला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर,विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव,के आर पाटील, जिल्हा परिषदेचे अविनाश पाटील,श्रीधर कुलकर्णी यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले.यामध्ये कवठेमहांकाळ तालुका मार्केट कमिटीचे चेअरमन दादासाहेब कोळेकर,सरपंच छायाताई कोळेकर,उपसरपंच दादासो हुबाले,ग्रामपंचायत अधिकारी सौ धनश्री पोळ-पाटील,सोसायटीचे चेअरमन राकेश कोळेकरसह  सर्व सदस्य,शाळा व अंगणवाडीचे विद्यार्थी्,शिक्षक,आशा वर्कर्स, आरोग्य सेवीका तसेच ग्रामस्थांनी  महत्वपूर्ण योगदान दिले.