NC Times

NC Times

आमदार गोपीचंद पडळकर यांनी माडग्याळ गावातील विविध विकास कामासाठी 58 लाख रुपये केले मंजूर माडग्याळ मधील विविध विकास कामांचे डॉ. रवींद्र आरळी यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)-आमदार गोपीचंद पडळकर यांनी माडग्याळ गावातील विविध विकास कामासाठी ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत त्या विकास कामाचे भूमिपूजन आज डॉ. रवींद्र आरळी , सरपंच सौ अनिता माळी, डॉ. सार्थक हिट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यामध्ये 90 -10 रोजगार हमी योजनेअंतर्गत सनमडी रस्ता ते बिरोबा मंदिर पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख रुपये व बिरोबा मंदिर परिसर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याकरीता १० लाख रुपये, सनमडी रस्ता ते मुकिंद कांबळे घराकडे जाणाऱ्या रस्ता सीडी वर्क बांधणे करीता आमदार फंडातून ८ लाख रुपये, जनसुविधा योजनेतून माडग्याळ ते आनंदनगर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे करिता 20 लाख, रुपये , 25 -15 योजनेतून हिरवडा बिरोबा मंदिर येथे सभामंडप उभारण्यासाठी १० लाख रुपये असे एकूण 58 लाख रुपये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मंजूर केले आहेत.
या भूमिपूजन प्रसंगी डॉक्टर सार्थक दादा हिट्टी, सरपंच सौ. अनिताताई माळी ,सोमण्णा हाक्के, विठ्ठल निकम, ग्रा.पं. सदस्य शिवानंद हाक्के, लिंबाजी माळी, अनिल पाटील, भाऊसाहेब दुधाळ, परसू बंडगर ,रावसाहेब जत्ती, निलाप्पा ऐवळे, मारुती माळी सदाशिव धुमाळे आदी व नागरिक उपस्थित होते