NC Times

NC Times

Rh Medicare नवीन मेडिकल व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सेवा देण्याची उत्तम संधी - डॉ . कैलास सनमडीकर


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)- माडग्याळ ता जत येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये RH Medicare मेडिकलचे उद्घाटन माडग्याळ गावचे लोकनियुक्त सरपंच सौ .अनिता माळी यांच्या  शुभहस्ते संपन्न झाला . 
RH Medicare मेडिकल उद्घाटनप्रसंगी डॉ . कैलास सनमडीकर म्हणाले की ,  RH Medicare मेडिकल माध्यमातून ग्रामीण भागातील विशेषता माडग्याळ येथील नागरिकांना दर्जेदार औषध त्याचबरोबर चांगली सेवा देण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे . 
आजकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे समाजातील सर्व वर्गातील लोकांना अनेक गंभीर आजारवरांच्या विळख्यात ओढले आहे. या आजारांशी सामना करताना औषधं सहन आणि माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरिता RH Medicare  मेडिकल निश्चितचं माडग्याळकरांना सेवा देणार आहे . 
माडग्याळ भागातील लोकांविषयी तळमळ असल्यामुळेचं त्यांनी सेवा करण्याचे हेतूने संजीवनी हॉस्पिटल मध्ये RH Medicare मेडिकल सेवा देणार आहेत . या सेवेत कमी पडणार नाही असा आत्मविश्वास वाटतो असे प्रतिपादन जतचे डॉ . कैलास सनमडीकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले . 
यावेळी माडग्याळ गावचे लोकनियुक्त सरपंच सौ . अनिता माळी , उपसरपंच बाळासो सावंत , ग्रामपंचायत सदस्य शिवानंद हक्के , पिरापा कांबळे , विठ्ठल निकम , जतचे सुप्रसिद्ध  डॉ .  कैलास सनमडीकर , डॉ .  हरीष माने  , डॉ . श्रीकांत मलाबादी ,  डॉ . शेखर हिटी , डॉ . कावेरी चौगुले , डॉ . भिमाणा माळी , डॉ . महादेव जाधव , डॉ . चिदानंद सुतार , काँग्रेसचे नेते व्हनापा माळी , सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर , आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .