NC Times

NC Times

सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती आटपाडी शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिघंची येथे तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धा संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-  जिल्हा परिषद सांगली व शिक्षण विभाग पंचायत समिती आटपाडी सन 2024 -25 यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धा दिघंची येथे पार पडल्या.
त्यामध्ये तालुकास्तरीय लोक नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 खरसुंडी या शाळेचा द्वितीय क्रमांक आला आहे .त्यानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुश्मिता पुजारी, उपाध्यक्ष श्री. नितीन मामा पाटील, सदस्य श्री. युवराज पुजारी, सदस्य सौ. पौर्णिमा भिसे, सदस्य श्री. किरण पुजारी व नृत्य दिग्दर्शक श्री. पुणेकर सर, सौ.अंजली पुजारी, श्री. जयेंद्र साळुंखे त्याचबरोबर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.