NC Times

NC Times

शालेय क्रीडा स्पर्धेत आता ४४ 'विनाअनुदानित खेळ',खेळांच्या या स्पर्धेचे वेळापत्रक १५ सप्टेंबर नंतर ठरणार

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):- शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडू हे घडत असतात.विद्यार्थ्यांचाही खेळाचा श्रीगणेशा येथूनच होत असतो.म्हणून या स्पर्धाही प्रचंड चुरशीने व इर्षेने खेळल्या जातात.तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,आंतरजिल्हा व विभागीय अशी रचना या स्पर्धेची असते.या शालेय स्पर्धाना सध्या नुकतीच सुरुवात होणार असून,१५ सप्टेंबर नंतर त्याचे खरे वेळापत्रक ठरणार आहे.मैदानी खेळासह कबड्डी,खो खो,कुस्ती,व्हॉलीबॉल, फुटबॉल,क्रिकेट,बुध्दिबळ या स्पर्धेतील चुरस पाहता खेळाडूंनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे प्रदर्शन येथे पाहायला मिळते.तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकतीच सुरुवात झाली असून पारंपारिक खेळाबरोबरच यंदा काही विना अनुदानित क्रिडा प्रकारांचाही समावेश या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथमच करण्यात आला आहे.
          क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.सन २०२४-२५ या वर्षातही क्रीडा संचालनालयाच्या निर्देशानुसार एकूण ९३ क्रिडा प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे.यामध्ये ४९ अनुदानित तर ४४ विना अनुदानित क्रीडा प्रकारचा यामध्ये समावेश असणार आहे.
 विनाअनुदानित क्रीडा प्रकारामध्ये पुढीलप्रमाणे खेळांचा समावेश असणार आहे.....टेनिस,क्रिकेट,आष्ट डु आखाडा,युनिफाइट,कूडो, स्पिडबॉल,टेंग सु डो,फिल्ड आर्चरी,मोंटेक्स बॉल क्रिकेट,मिनी गोल्फ,सुपरसेवन क्रिकेट,बेल्ट रेसलिंग,फ्लोअर बॉल,थायबॉक्सिंग,रोप स्किपिंग,हाप किडो बॉक्सिंग,सीलंबम,वूड बॉल,टेनिस व्हॉलीबॉल, थांगता मार्शल आर्ट्स,कुराश,लगोरी,रस्सीखेच,पॉवर लिफ्टींग,बीच व्हॉलीबॉल,टार्गेट बॉल,जीत कुने दो,फुटसाल,कॉर्फबॉल,टेबल सॉकर,हुप क्वान दो,युग मुन दो, वोवीनाम,ड्रॉप रो बॉल,ग्रपलींग, पेंट्याक्यू,लंगडी, जंप रोप,स्पोर्ट्स डॉन्स,चॉयक्वांदो,फुटबॉल,टेनिस,बुडो,म्युझिकल चेअर,टेनिस बॉल क्रिकेट या खेळांचा समावेश असणार आहे.