NC Times

NC Times

आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूल येथे संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्या शुभहस्ते उध्दाटन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-
राजारामबापू हायस्कूल आटपाडी या ठिकाणी 16 सीसीटीव्ही कॅमेरे संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज बसवण्यात आले बसवण्यात आलेल्या 16 सीसीटीव्ही कॅमेरा संच उद्घाटन कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्माननीय मुक्तेश्वर माडगूळकर साहेब संस्थेचे पदाधिकारी श्री सुरज पाटील साहेब आरोग्य विभाग विस्तार अधिकारी ठोंबरे साहेब समग्र शिक्षा श्री प्रशांत चंदनशिवे मुख्याध्यापक टी डी चव्हाण सर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये सदरच्या सीसीटीव्ही संचाचे उद्घाटन सन्माननीय गटविकास अधिकारी माडगूळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आदरणीय माडगूळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाचे असून सर्वच खाजगी शाळांनी राजारामबापू हायस्कूल या संस्थेचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आटपाडी तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक सर्व शाळांनी सीसीटीव्ही बसवून विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढवावी असे भावनिक आव्हान केले