NC Times

NC Times

श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे कर्मवीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-   शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी या विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयातील अर्धाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व अण्णांची प्रतिमा रथामध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, टिपरी नृत्य, झांज पथक व पारंपारिक गजीनृत्य याचे प्रात्यक्षिक सादर केले. मिरवणुकी दरम्यान विधान परिषद सदस्य माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी मिरवणुकीला सदिच्छा भेट दिली. मिरवणुकी दरम्यान गावातील महिला भगिनींनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी खरसुंडी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री धोंडीराम आप्पा इंगवले, रयत शिक्षण संस्था दक्षिण  विभागाचे सल्लागार समिती सदस्य विलास नाना शिंदे, स्कूल कमिटी सदस्य श्री. दिलीप अण्णा  सवणे , धनुभाऊ पुजारी माजी सरपंच वीरकर जावीर माजी मुख्याध्यापक आरडी पुजारी सर तसेच माजी मुख्याध्यापक जावीर सर,  युवा नेते राहुल पुजारी, माजी सरपंच अंजली गुरव त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी चे मुख्याध्यापक श्री पवार सर पर्यवेक्षक श्री किर्दत सर सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.