NC Times

NC Times

आटपाडी पंचायत समिती मध्ये माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-  माहिती सार्वजनिक केली!आणि वेबसाईटवर टाकली, तर ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच येत नाही तसेच माहिती सार्वजनिक करायला काही लोकांचा विरोध आहे. माहिती अधिकार कायदा जनतेचा अंकुश ठेवणारा कायदा असून, आत्तापर्यंतचे सर्व कायदे हे जनतेवर अंकुश ठेवणारे कायदे होते. प्रामाणिक लोकहित यासाठी चांगले काम करणाऱ्यांना धोका नाही. अधिकारी कर्मचारी जनतेचे सेवक आहेत. त्यांच्याविषयी आदरभाव ठेवावे. असे आवाहन माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख यांनी  केले.
आटपाडी पंचायत समिती येथे आयोजित जागतिक माहिती अधिकार दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र खरात होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन फोंडे  यांनी केले.
आपण माहिती का मागवतो हे पारदर्शकपणे आपल्या मनाशी व इतरांशी सांगता आले पाहिजे, असे शेवटी शेख म्हणाले. यावेळी उपस्थितांच्या  शंकांचे निरसन त्यांनी केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी वाघमारे, पुरवठा अधिकारी दादासो पुळके, भूमी अभिलेख अस्लम मुजावर, प्रभारी उपशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे, कक्ष अधिकारी सौ. व्ही. पी. मंडले, ए. टी. मगदूम, पी. एस. शिपुरे, निवृत्त अधिकारी फिरोज शेख, एड. त्रिशाला पाटील, आयुब सुतार, प्रमोद सुतार, विनोद कदम उपस्थित होते. आभार राजू शेख यांनी मानले. यावेळी बहुसंख्य अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.