NC Times

NC Times

राष्ट्रीय स्तरावर ज्ञानदीप स्कूलचा विजयघोष, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्ञानदीपची कु.सज्ञा वाशिवले ची गरुडझेप


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी- (प्रा.ह.भ.प.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
कोणत्याही देशाच्या विकासासाठी त्या देशातील वैज्ञानिक प्रगतीचे योगदान हे महत्वपूर्ण ठरते.विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे,आणि नवीन शोधांना प्रेरणा देणे, या साठी असतात ती ' विज्ञान प्रदर्शने 'आणि ' इनस्पायर ॲवार्ड प्रदर्शने ' आयोजित केली जातात
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन/महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर,नागपूर
11वे रस्तरीय इनस्पायर ॲवार्ड विज्ञान प्रदर्शन दि. 17,18, 19सप्टेंबर 2024 या कालावधीत दिली येथे भरले .यामध्ये एकूण 360 उपकरणातून 31उपकरणाची निवड झाली.   
त्यामध्ये  परपंरा व संस्कृती यांचे संवर्धन करणारे महान असे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शूरवीरांच्या,स्वातंत्र्य सैनिकांचा    बाणेदार असा  सातारा जिल्हा अश्या जिल्ह्यातून प्रसिद्ध अश्या धार्मिक, ऐतिहासिक,अध्यात्मिक, तीर्थक्षेत्र 'दक्षिण काशी 'म्हणून ओळखला जाणारा  वाई  तालुका  पर्यटन क्षेत्र  प्रसिद्ध असे महाबळेश्वर तालुक्याच्या  घाटाचा जेथून प्रवास सुरू होतो अशा घाटाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या सान्निध्यातील ' ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल  व ज्युनिअर कॉलेज (पसरणी,वाई)या शाळेतील  विद्यार्थ्यांनी कु. सज्ञा  ज्ञानदेव वाशिवले या विद्यार्थीनीने बनविलेले स्मार्ट मल्टीपुरपास टेबल या  उपकरण राष्ट्रीय स्तरावर विजेते ठरले तसेच तिला ते सकुरा जपान येथे सादर करण्याची संधी प्राप्त केली.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असल्यास कोणतीही असाध्य गोष्ट ते सहज साध्य करू शकतात आपल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून तिने तिचे उपकरण. बनवून आपल्या महाराष्ट्राचे , सातारा जिल्हा,वाई तालुका व ज्ञानदीप स्कूल पसरणी चे नाव देशात उज्वल केले.
'दिल्ली चे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे दाखवून दिले.राष्ट्रीय inspire अवॉर्ड विजेती कुमारी सज्ञा ज्ञानदेव वाशिवले हीचे व तिला मार्गदर्शन करणारे तिचे पालक श्री.ज्ञानदेव वाशिवले , सौ.सरस्वती वाशिवले , मार्गदर्शक शिक्षिका कु.लीना जाधव यांचे  ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पसरणी वाई चे अध्यक्ष श्री. एकनाथ जगताप, उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत ढमाळ, सचिव श्री. बाळकृष्ण पवार, खजिनदार श्री. चंद्रकांत शिंदे, विश्वस्त श्री विश्वनाथ पवार, श्री जिजाबा पवार, श्री दत्तात्रय वाघचवरे,श्री. दिलीप चव्हाण,श्री. विजय कासूर्डे, श्री.रवींद्र केंजळे, श्री.दत्ता मर्ढेकर, श्री. दुष्यंत जगदाळे, प्राचार्या शुभांगी पवार यांनी कौतुक ,अभिनंदन केले व पुढील वाटचालीस नवचैतन्य टाईम्स परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्रा.सौ.सरस्वती  वाशिवले