NC Times

NC Times

तासगाव-कवठेमहंकाळ विधानसभा मतदारसंघात 'ओबीसी बहुजन पार्टी ' ताकदीने लढणार- अमोल ओलेकर


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- मुंबई येथे झालेल्या 'ओबीसी बहुजन पार्टी'  च्या कार्यकारिणी बैठकीत मुंबई महापालिकेचे निवृत्त उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून कामाला लागण्याच्या सुचना त्यांना पार्टीच्या वतीने दिल्या असल्याची माहिती युवा नेते अमोल ओलेकर यांनी दिली.
       यावेळी बोलतांना अमोल ओलेकर पुढे म्हणाले की मुंबई येथे पक्षाच्या कार्यकरणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे व महासचिव चंद्रकांत बावकर यांनी भाऊसाहेब कोळेकर यांना तश्या सुचना केल्या असून,तासगाव-कवठेमहंकाळ मतदार संघ हा ओबीसी बहुजन समाजाचा हक्काचा मतदार संघ असुन,सत्ताधीशांच्या नाकर्तेपणामुळे येथील मतदार चांगलाच पिचला असुन तो योग्य संधीची व चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे.त्याला भाऊसाहेब कोळेकर हे एकमेव पर्याय ठरू शकतात असेही ओलेकर यावेळी म्हणाले.त्यामुळे उद्याच्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन समाज पार्टी पुर्ण ताकदीने व जिंकण्याच्या निर्धारानेच उतरणार असल्याचेही शेवटी ते म्हणाले.