NC Times

NC Times

ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल महागले सामान्याला झळ,शेतमालाला भाव नाही माञ खाद्य तेल २५ ते ३० रुपयानी महागले


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :-
ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य जनतेला झळ बसत आहे.शेतमालाला भाव नाही मात्र खाद्यतेलाच्या किमती २५ ते ३० रुपये प्रति किलो ने महागल्याने सणासुदीच्या तोंडावर सामान्य शेतकरी जनतेचे कंबरडे मोडणार आहे.
    सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के आयात शुल्क कारल्यामुळे.राज्यात खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत.ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाचे वाढलेले दर हे ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसवणारे आहेत अशा प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत.एकीकडे शेतमालाचे भाव वाढायला तयार नाहीत मात्र दुसरीकडे सरकार खाद्यतेला सारख्या महत्त्वाच्या वस्तूच्या किमती वाढवण्यासाठी पोषक आसे निर्णय घेत असल्याने, सामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
           सूर्यफूल पुर्वी १०५ रुपये किलो होते ते आज १३५ रुपये किलो झाले आहे.तर सोयाबीन तेलाचा दर १०५ रुपये किलो दर होता तेच तेल आज १३० तर.शेंगदाणा तेल आधिचा दर १७० रुपये किलो दर होता त्याचा आजचा दर १८५ रुपये किलो झाले आहे.याप्रमाणे खाद्यतेलाचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी सामान्य नागरिकांच्या खिशाला याची झळ बसणार आहे.या दरवाढीमुळे सरकारवर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.खाद्यतेलाचे पुर्वीचे व सध्याचे दर हे पुढीलप्रमाणे........
१) सुर्यफुल तेल :- १०५ रुपये आधिचा दर तर  १३५ रुपये सध्याचा दर.
२) सोयाबीन तेल :- १०५ रुपये आधीचा दर -- १२५ रुपये सध्याचा दर.
३) शेंगदाणा तेल :- १७० आदिचा दर-- १८५ रुपये ‌सध्याचा  दर
४)पामतेल :- १०० आधीचा दर तर १२० सध्याचा दर याप्रमाणे आहे.