NC Times

NC Times

कवठेमहांकाळ तालुक्यात गणरायाचे उत्साही आगमन व प्रतिष्ठापना


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/ वार्ताहर(जालिंदर शिंदे) 
'गणपती बप्पा मोरया'  च्या गजरात कवठेमहांकाळ शहरासह  तालुक्यातील ग्रामीण भागात सार्या दैवतांचा राजा समजल्या जाणाऱ्या गणरायाचे अर्थात गणपतीचे पारंपरिक वाद्यांसह मोठ्या उत्साहात आगमन झाले.घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.गणेशभक्तांची अगदी महीन्यापासूनच गणरायाच्या आगमनाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
   काल सर्वत्र अगदी सकाळ पासूनच गणरायाच्या आगमनाची व प्रतिष्ठापनेची लगबग दिसून येत होती.गणपती मुर्ती खरेदीसह त्याला करावया लावणार्या सजावटीचे साहित्य,लायटिंग डेकोरेशन,पुजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा खचाखच भरल्या होत्या.तालुक्यात अगदी सर्वत्रच समाधानकारक पाऊस झाल्याने चांगले फिलगुडीचे वातावरण दिसत होते.