NC Times

NC Times

खरसुंडी येथे धनगर आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-
धनगर समुदायातून येणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुती सरकार विरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर मध्ये उपोषण सुरू असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी 23 तारीख महाराष्ट्रभर रस्ता रोको करण्याचे हाक दिली आहे सरकारवर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केला जात आहे निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाज आक्रमक झाल्याने त्यांची मन धरणी करण्याचे मोठे आव्हान महायुती समोर उभे राहिले आहे खरसुंडी येथे मोठ्या संख्येने धनगर समाज उपस्थित राहून व मेंढरं घेऊन रस्ता रोको करण्यास उपस्थित राहिलेरास्ता रोको साठी प्रामुख्याने उपस्थिती विलास काळे बाग विलास जानकर तानाजी कटरे अंकुश कोळेकर संजय कोळेकर राहुल गुरव छगन साळुंखे तानाजी शिरसागर संजय कटरे गजानन खरात दिलीप चोपडे काशिनाथ चोपडे मोहन पडळकर हे धनगर समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते