NC Times

NC Times

राजश्री सोले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे संपन्न!


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- 
नुकतेच राजश्री सोले यांच्या एक एक हिरकणी आणि प्रकाशाकडे निघालेल्या अंधारवाटा या दोन पुस्तकांचे प्रकाशन भाविसा सभागृहात पार पडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक स्नेहसुधा कुलकर्णी होत्या. एक एक हिरकणीचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांचे हस्ते आणि प्रकाशाकडे निघालेल्या अंधारवाटा या पुस्तकाचे प्रकाशन आघाडीचे गझलकार भूषण कटककर यांचे हस्ते झाले. 
हा कार्यक्रम रघुराज या संस्धेने आयोजित केला होता.
सुरूवातीला राजश्री सोले यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना चांदगुडे या एक एक हिरकणी या पुस्तकावर तर भूषण कटककर प्रकाशाकडे निघालेल्या अंधारवाटा या पुस्तकाबद्दल बोलले.  पुस्तकातील कथांच्या निमित्ताने स्त्रीजाणीवांचे संदर्भ देत पुस्तकाविषयी सर्व श्रोत्यांच्या मनात त्यांनी उत्सुकता निर्माण केली. तर स्नेहसुधा कुलकर्णी यांनी राजश्री काव्यलेखनाबरोबर कथालेखन, नाट्यलेखन, स्फुटलेखन असे निरनिराळे लेखन प्रकार हाताळते आहे व अभिवाचन, काव्यवाचन करीत यशाची एक एक पायरी चढते आहे. असे कौतुकास्पद उद्गार काढले.
दुसऱ्या सत्रात मीना शिंदे, मृणाल जैन, , मनिषा साने, योगेश काळे, अपर्णा आंबेडकर यांनी राजश्री सोले यांच्या कविता म्हटल्या तर धनंजय तडवळकर, विजय सातपुते, वंदना घाणेकर, शिल्पा देशपांडे आणि राजश्री सोले यांनी त्यांच्या पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन केले.
निरुपमा महाजन व वैजयंती आपटे यांनी अतिशय बहारदार असे सूत्रसंचालन केले. योगिनी जोशी यांनी आपल्या मधुर आवाजात सरस्वती वंदना सादर केली.
प्रकाशन समारंभास काव्यशिल्प, आम्ही सिद्ध लेखिका, साहित्य संघ दक्षिण, साहित्यदीप, रंगतसंगत इ. संस्थांमधील मान्यवर सभासद उपस्थित होते.‌ तसेच राजश्री सोले यांचे बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
रघुराजचे विलास सोले, रोहिणी तरटे, अविनाश तरटे, मकरंद घाणेकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले.