NC Times

NC Times

घाटनांद्रे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन व पालक सुसंवाद मेळावा संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पालक व शिक्षक यांच्या एकत्रित सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.याला पालकांच्या कडूनही मोठा प्रतिसाद लाभला होता.सदर सभेमध्ये अनेक शालेय विषयावर उहापोह करण्यात आला.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील होते.
         यावेळी शिक्षक व पालक यांच्या मध्ये सुसंवाद होऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानुसार स्पर्धा परीक्षांसाठी जादा तास घेण्याचे नियोजन करण्यात आले.शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालक यांनी समन्वय साधुन काम करण्याचे ठरले.
       यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे बहुमतावर आधारित पुनर्गठन करण्यात आले.त्यानुसार अगदी बहुमताने अध्यक्षपदी संतोष तुकाराम पाटील यांची तर सौ मेघा विशाल शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर दादासो रास्ते,संतोष पवार,अजित शिंदे, सचिन शिंदे,सौ वैशाली शिंदे,सौ मनिषा खाडे,सौ नंदाताई शिंदे, श्रीमती तेजस्विनी शिंदे हे पालक सदस्य तर लक्ष्मण मोहीते हे शिक्षक सदस्य तर कु सिध्दी शिंदे व शौर्य शिंदे हे विद्यार्थी प्रतिनिधी तसेच महादेव शिंदे हे शासकीय प्रतिनिधी म्हणून निवडी पार पडल्या.
        यावेळी सरपंच अमर शिंदे, उपसरपंच सुनील कांबळे, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, शिक्षक सर्वश्री लक्ष्मण मोहिते,सौ सुनंदा पाटील मावळत्या शिक्षक समितीच्या अध्यक्ष स्वाती कदमसह, पोलिस पाटील एकनाथ उर्फ महादेव शिंदेसह पालक,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्वानुमते सौ कोमल शिंदे यांची मदतनीस शिक्षका म्हणून नेमणूक करण्यात आली.शेवटी आभार सौ सुनंदा पाटील यांनी मानले.