NC Times

NC Times

हायुम सावनूरकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ येथील पुरोगामी विचारसरणींचे खंदे समर्थक व धडाडीचे कार्यकर्ते हायुम सावनूरकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली‌ आहे.तश्या आशयाचे पत्र प्रदेशाअध्यक्ष जयंतराव पाटील यांनी त्यांना प्रदान केले.नुकतेच त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात सामील झाले होते.
   ‌ हायुम सावनूरकर यांचे संघटन कौशल्य हे अगदी मोठे असुन,जनसामान्यांशी एकप्रकारे त्यांची नाळ जोडली गेली आहे.राजकारणातील ते एक चाणक्य आहेत.तेव्हा त्यांनी आपल्या या नितीचा पक्षाच्या वाढीसाठी व आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत वापरून पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाअध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
     तर पक्षाने दिलेल्या संधीचे पुर्णतः सोने करुन पक्षाच्या बांधणीसाठी भरीव काम करणार असल्याची ग्वाही देत,प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार श्रीमती सुमनताई पाटील,युवा नेते रोहितदादा पाटील व श्रीमती अनिताताई सगरे यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षवाढीसाठी राज्यभर काम करणार असल्याचे सावनुरकर त्यांनी यावेळी सांगितले.