NC Times

NC Times

सिंधुदुर्ग शिक्षक दिन पुरस्कारात महिलांची बाजी


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-    जनजागृती सेवा संस्था, मुंबई, च्या वतीने दिले जाणारे  शिक्षक दिन निमित्ताने दिलें जाणारे पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारामध्ये   पुरस्कारामध्ये महिला शिक्षिकांनी बाजी मारली आहे. राज्यातील शिक्षक पुरस्कारांची घोषणा सोमवारी संस्थाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्राथमिक विभागातील  माध्यमिक विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली .
माध्यमिक आणि प्राथमिक हे दोन्ही पुरस्कार
महिलांनी मिळवले आहेत प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारनाथनगर ता कोरेगाव जि सातारा  येथील सौ सुषमा दिलीप आलेकरी यांना जाहीर झाला आहे तर माध्यमिक विभागातून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पुणे येथील शुभांगी शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या वर्षी कणकवली, सिंधुदुर्ग या ठिकाणी 5 सप्टेंबर पुरस्कार सोहळा होणार आहे, सततचा पाऊस,लांब पल्ल्यामुळे काही पुरस्कार ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्कार प्राप्त मान्यवर खालील प्रमाणे 
 डॉ,प्रा भाग्यश्री जोगदेव पुणे,
प्रिन्सिपल भारती नर्सिंग कॉलेज पुणे, प्रा, शुभांगी शिंदे, फलटण -पुणे, प्रा, शुभांगी गादेगावकर, ठाणे, प्रा सुरेखा भालेराव, पंढरपूर,,स्वातीताई मोराळे, बीड -उस्मानाबाद-पुणे  मिसेस अमोल कुलकर्णी, विरार -पुणे मनीषा वाघमारे मुंबई, सुषमा आलेकरी, सातारा, प्रा मीना सुर्वे, आष्टा, प्रा,रश्मी सिंग पुणे,प्रा, सुजाता खरात पुणे, प्रा, पलवी देशपांडे, इंदोर,- पुणे  प्रा, तबसूम पाठण, विजापूर -पुणे,प्रा शुभांगी वाघमारे आटपाडी, सांगली प्रा भारती देशमुखे, आटपाडी -सांगली, प्रा, विद्या सर्वगौड पंढरपूर -आटपाडी, प्रा,रुपाली झांबरे नागपूर -पुणे, प्रा, योगिता कोठेकर निगडी -पुणे,डॉ, प्रा, नीता बोडके पुणे गरवारे कॉलेज पुणे, प्रणिता कांबळे सोलापूर, प्रशासकीय अधिकारी,डॉ. प्रा,तृप्ती ना. सोनवणे जोशी बेडेकर (स्वायत्त) महवियालय , ठाणे, रघुनाथराव ढोक, छत्रपती शाहू कॉलेज पुणे शिखर शिंगनापूर -पुणे,श्रीकृष्ण बेडगे, रयत शिक्षण संस्था महूद, -मंगळवेढा प्रा चंद्किशोर पांडे पुणे रावसाहेब सोमा चव्हाण 
मुख्याध्यापक कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी ता शिरपूर जि धुळे,प्रा, रोहन वडमारे, पुणे 
५सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो,आम्ही जनजागृती सेवा संस्था(रजि.)या संस्थेकडुन ऑफलाईन कुठल्या ना कुठल्या शहरात संस्थेच्या वतीने शिक्षक दिन साजरा करत असतो.तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक,शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणा-या व्यक्ती,शिक्षक-शिक्षिका यांचा ऑनलाईन पध्दतीने"आकर्षक सन्मानपत्र पाठवुन सन्मान केला जातो
शिक्षक दिन निमित्ताने सर्व शिक्षक बंधू, भगिने, प्रशासकीय अधिकारी सर्वांचे आभार पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, विशेष आभार मा,राहुल खरात, पुणे संयोजन कमिटी,  जागतिकआंबेडकरवादी साहित्य महामंडळ 
     प्रतिक्रिया 
डॉ नीता बोडके 
फुले आंबेडकर महामानव माझे प्रेरणास्थान यांच्यामुळे मी थोडीफार समाजाच्या हितासाठी धडपडणं यात माझी शान आहे डॉक्टर नीता बोडके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
सौ सुषमा दिलीप आले करी 
आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मानपत्र देऊन सन्मानित केले याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांना सन्मानपत्र देऊन प्रेरणा दिली आपली जनजागृती सेवा संस्था ही आदर्श सेवा संस्था हीच उपमा योग्य ठरेल खरंतर राहुल सरांमुळे मला आपणापर्यंत पोहोचता आले खरात सर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या कार्याचे कौतुक करतात माननीय तिरपणकर सर व संचिता मॅडम यांना धन्यवाद .
डॉक्टर तृप्ती सोनवणे ठाणे 
जनजागृती सेवा संस्था यांनी शैक्षणिक कार्य करणाऱ्या सेवाभावी प्रामाणिक शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन उस्फूर्तपणे निरपेक्ष भावनेने सन्मानपत्र देऊन गौरवले आहे त्याबद्दल मी आपली व राहुल खरात सरांची शतशः आभारी आहे आपले खूप खूप धन्यवाद आपल्या कार्यासाठी शुभेच्छा .
सौ शुभांगी वाघमारे 
माझ्या कार्याची दखल घेऊन मला सन्मानित केले त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरुपणकर सचिव संचिता भंडारे राहुल खरात सर यांचे आभार जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलन संयोजन कमिटी यांचे कोटी कोटी धन्यवाद शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून तुम्ही त्यांच्यामध्ये एक नवीन उमेदवार निर्माण करण्याचे काम करत आहात तुमच्या या कार्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसाला आदर्श पिढी घडवण्याचे काम करत आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो आणि जनजागृती सेवा संस्थेच्या या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
सर्व गुरू जनांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ कीर्तनकार सचिव संचिता भंडारी यांचे  आभार मानण्यात आली  तसेच राहुल खरात यांनीही या पुरस्कार सोहळ्यात विशेष सहभाग नोंदवीला आहे.


विशेष आभारः- मा.राहुल खरात