NC Times

NC Times

जत येथील एस.आर.व्ही.एम हायस्कूल मधील (सन १९७३-७४) इ.११वी च्या माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा संपन्न..


नवचैतन्य टाईम्स जत(नजीरभाई चट्टरकी)- येथील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा मोठ्या उत्साही समारंभ व त्यांच्याकडून लाभले मोलाचे मार्गदर्शन..सांगली जिल्ह्याच्या जत शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठा मंदिर मुंबई संचालित सुप्रसिद्ध श्री रामराव विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज सभागृहात सन 1973 - 74 मधील इयत्ता अकरावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला.
अमेरिकेतून परतलेल्या पुणे स्थित प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सौ शुभा भिसे- देशपांडे यांच्या संकल्पनेतून व तसेच एक धडाडीचे अभ्यासू विद्यार्थी म्हणून कला क्रीडा एनसीसी मध्ये शाळेत कायम आघाडीवर असणारे श्री सतीश विठ्ठलराव शिंदे यांच्या निरंतर प्रयत्नाने स्थानिक काही वर्ग मित्र संजय कुलकर्णी, महबूब शेख, सिंधू माळी, मोहन माळकोटगी अशोक पोरे, गंगाराम चव्हाण यांच्या सहकार्याने देश विदेशातील व स्थानिक माजी विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क साधून तसेच दोन बैठका घेऊन नुकतेच एस आर व्ही एम हायस्कूल च्या हॉलमध्ये. हा स्नेह मेळावा संपन्न करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे प्रभाकर भाऊ जाधव,प्रशालेचे निवृत्त शिक्षक माननीय श्री एस आर माने सर व श्री आर. ए. पाटील सर. प्राचार्य मानसिंग बनसोडे व करे सर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली.दोन सत्रात घेण्यात आलेल्या या संमेलनात सकाळी शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
त्या नंतर प्रशालेचे कडक शिस्तीचे दिवंगत मुख्यापक रा.बा. पाटील सर यांच्या सह शिक्षक व वर्ग मित्रांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली नाष्टा चहा पाना नंतर कार्यक्रमास सुरु करण्यात आले संमेलना दरम्यान मैदानावर वृक्षरोपण,संगीत खुर्ची, जलद चालणे, लिंबू चमचा या स्पर्धा पार पडल्या याच बरोबर मनोरंजन चित्रपटातील गाणी तसेच किशोरकुमार फॅन्स क्लब आर्केस्ट्रा च्या माध्यमातून दोन तास सदाबहार हिंदी व मराठी गाणी पेश करण्यात आली. यावेळी ऑर्केस्ट्रातील गायक कलाकारांचा सत्कार बसवराज हिट्टी व चंदा कलावंत यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
याप्रसंगी प्रभाकर भाऊ जाधव श्री एस आर माने सर, आर. ए.पाटील सर तसेच कटरे सर यांचा सत्कार करण्यात आला तर त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव शेअर करत मनोगत व्यक्त केले..
दरम्यान संमेलनाच्या आदल्या दिवशी प्रशालेचे निवृत्त प्राचार्य होनमाने सर.श्री व सौ.पोतनीस सर , बालगांवकर सर, एन पी पाटील सर व भोसले सर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यासाठी सदानंद पोतदार,सौ.उषा चव्हाण विलास मोरे,पप्पु मोटे दिनकर पतंगे, 'पापा कुलकर्णी,सौ रेखा सराफ,श्रीमती.शशी क्षीरसागर, सौ.संजीवनी झेंडे,श्रीमती.भारती श्रेष्ठ या सर्वांचे सहकार्य लाभले..
यावेळी श्रीनिवास वसंत दीक्षित यांनी लिहिलेल्या "रिकाम्या जागा" या कविता संग्रहाच्या 50 प्रति सर्वांना वितरित करण्यात आल्या.. याच बरोबर सर्व माजी विद्यार्थ्यां कडून प्रशलेस एक लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली.. 
दुपारच्या सत्रात एकमेकांचा परिचय करून देऊन सध्याच्या जीवनातील वास्तव परिस्थितीवर आपापले विचार प्रकट केले.शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व गुला, ब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला..याप्रसंगी मंगला खोचीकार -खासनीस मॅडम यांनी कॅलीफोर्निया हून संमेलना साठी पाठवलेले खास शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले..
कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ सुषमा कुलकर्णी -टांकसाळे यांनी अत्यंत सुंदर अशा शब्ध संवादने करुंन सर्वांची मने जिंकल्या तर शेवटी उपस्थितांचे आभार सतीश शिंदे यांनी मानले.