NC Times

NC Times

घाटनांद्रेत संपता शिंदे ठरल्या पैठणीच्या मानकरी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहितदादा आर आर (आंबा) पाटील यांच्या संकल्पनेतून घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील साहील मल्टिपर्पज हॉलमध्ये घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर अर्थात  'क्षण आनंदाचा,खेळ पैठणीचा' या कार्यक्रमात अगदी अटीतटीच्या खेळात अंतिम फेरीत संपता बापुराव शिंदे या विजेत्या ठरुन त्या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत.त्यांच्या या यशाचे उपस्थित महिलांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केले.
बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून रंगलेल्या या खेळात उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकच जल्लोष केला.स्पर्धेसाठी उखाणे स्पर्धा,डान्स स्पर्धा,विविध प्रकारच्या प्राण्यांचे आवाज,फुगे फोडणे,प्रेक्षक महीलां सोबत सेल्फी घेणे अश्या विविध प्रकारच्या खेळांचा यामध्ये समावेश होता.
       सदर खेळास सादरकर्ते निवेदक अक्षय मोरे (पुणे) यांनी आपल्या बहारदार वाणीने चांगलीच रंगत आणली होती.यावेळी स्पर्धक महीलासह प्रेक्षक महीलांनीही डांन्ससह मनमुराद आनंद लुटला.
     सदर स्पर्धेत संपता बापुराव शिंदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या त्यांना उपस्थित महिलांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आले.तर द्वितीय क्रमांक किचनसेटच्या विजेत्या सुनिता प्रविण मलमे तर मेघा प्रकाश रास्ते या तृतीय क्रमांक मिळवून कुकरच्या मानकरी ठरल्या.तर पवित्रा बाळासाहेब शिंदे या चौथा क्रमांक मिळवून इडली पात्राच्या मानकरी ठरल्या.या सर्व विजेत्यांना उपस्थित महिलां पदाधिकाऱ्याच्या शुभहस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.शेवटी वैशाली शिंदे यांनी आभार मानले.