NC Times

NC Times

पितृपंधरवाड्यामुळे विविध भाज्यांची मागणी वाढली,तर दरात १० ते २०% टक्क्यांनी वाढ...


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सध्या सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली असून,त्यामुळे भाज्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भाजी मार्केट मधील ज्येष्ठांचे मत आहे.
      पितृपंधरवड्यात गवार, भेंडी,कारली,चवळीच्या शेंगा,मुळा,आले,अळूची पाने, काकडीसह विविध प्रकारच्या पालेभाज्यांना दरवर्षी मोठी मागणी असते.या भाज्यांची मागणी वाढल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता नाही.उलट मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक न झाल्यास आणखी दर वाढू शकतात.सद्य:स्थितीत वाढलेल्या मागणीमुळेच घाऊक आणि किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव वाढल्याचेही भाजी व्यापारी नमूद करत आहेत.बाजारात भाजीपाला विभागात पितृपंधरवड्यानिमीत  लागणार्‍या भाज्यांची आवक कवठेमहांकाळ तालुक्यात होत आहे.पावसाची सध्या उघडझाप सुरू आहे.विक्रीसाठी बाजारात दाखल होत असलेल्या भाज्यांचा दर्जाही सध्या चांगला आहे. त्यामुळेही चांगला दर मिळत आहे, 
     पेरू,केळी,डाळिंबालाही मागणी
पितृपंधरवड्यात जशी विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते तशीच काही फळांनाही मागणी रहाते.पेरू,केळी आणि डाळिंबाला मागणी वाढल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात या तीनही फळांच्या दरात वाढ झाली आहे.पेरू आणि केळीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
घाऊक बाजारात डाळिंबाचा प्रतिकिलोचा भाव १०० ते २०० रुपये,केळी ४० ते ६० रुपये डझन,तर पेरूचा किलोचा भाव दर्जानुसार ८० ते १०० रुपये तर सफरचंद १५० ते २०० रुपये प्रमाणे सध्या चालू आहे.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे किलोचे दर
१) गवार -१२० रुपये किलो.
२) भेंडी - ८० रुपये किलो.
३) कारली - ८० रुपये किलो.
४) चवळी - ८० रुपये किलो.
५)काकडी - ८० रुपये किलो.
६) अळूची पाने -२० रुपये गड्डी.
७) शेवगा शेंग- १०० रुपये प्रमाणे.
८) गाजर -८० रुपये किलो.
  असे दर बाजारात दिसून येत आहेत.