NC Times

NC Times

सार्वजनिक जागेत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी : भालेघर ग्रामस्थ आक्रमक ; तहसीलदारांकडे घेतली धाव


नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी(शरद झावरे)-: डोंगरमाथ्यावर वसलेल्या जावली तालुक्यातील दुर्गम अशा भालेघर गावाची विकासाकडे दमदार वाटचाल चालू आहे. सार्वजनिक विकास कामात 'रामनामांचे ' नाव घेत अनधिकृत बांधकाम करून ' दत्त ' म्हणून उभे ठाकत अडथळा निर्माण करणाऱ्या हेकेखोर अडेलतट्टुवर कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाला संबंधित कोलदांडा दाखवत असून त्यांचेवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जाणार आहेत. 
याबाबत अधिक माहिती अशी की दिवदेव - मार्ली - भालेघर दुर्गम असणाऱ्या डोंगर माथ्यावरील गावांना जोडणारा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधला आहे. परंतु या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गटरचे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे आपल्याच गावच्या विकासाला आपलेच लोक विरोध करीत असल्याने गावात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. 
याबाबत ग्रामपंचायत, सरपंच यांनी सांगून सुध्धा सार्वजनिक ठिकाणी या व्यक्तीचे अनधिकृत बांधकाम बिनधास्तपणे चालू आहे. याबाबत ग्रामपंचायतीने हतबल होऊन जावळी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हंटले आहे की दिवदेव - मार्ली - भालेघर - आखाडे रस्त्याचे रुंदीकरण काम नुकतेच  सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जावली (मेढा) यांनी केले असून मौजे भालेघर हे गाव डोंगरावर वसलेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. तरी सदर रस्त्यालगत असणारे नाले दत्तात्रय रामचंद्र पवार यांनी त्यांच्या घरा लगत सिमेटपाईप टाकूण बांधकाम करुन पाणी वाहण्यास अडथळा केला आहे.
 त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. लगतच्या घरांमध्ये पावसाचे पाणी जात आहे. सदरचे सांडपाणी सदर नाल्यांमधून पुढे वाहून जाणे आवश्यक आहे. परंतु ते तुंबून राहिल्याने या परिसरात रोगराईचा प्रश्न उद्भवणार आहे. हा धोका ओळखून  सदरचे नाले उकरून सांडपाणी सुरळीत करून द्यावे व होणारी गैरसोय दूर करावी. त्याचबरोबर संबंधित नाला बंद करणारे खातेदार यांच्यावर आपणा मार्फत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती या निवेदनात केली आहे.
शासकीय निधीचा वापर चालू असताना जर अशा गाव टग्यानी जर या कामाला घोडा लावण्याचे काम केले तर या निधीचा विनियोग होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना याचा फटका बसणार आहे. गावापेक्षा राव मोठा नाही त्यामुळे अशा अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.