NC Times

NC Times

जत मतदारसंघ भाजपचाच-मा.रघुनाथ कुलकर्णी आमदार पडळकरांना बैठकीचे निमंत्रण नाही तर डॉ.आरळी यांची माघार


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)-जतमधून पुन्हा कमळ फुलवायचे आहे. मागील वेळेचा बदला घ्यायचा आहे. महायुतीमधून जतमध्ये भाजपचा उमेदवार असेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे केंद्रीय पदाधिकारी रघुनाथ कुळकर्णी यांनी केली.
जत विधानसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. या बैठकीस क्षेत्रीय संघटन मंत्री अजय जमवाल, विभागाचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रविपाटील, जेष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मिलिंद कोरे, प्रभाकर जाधव, बसवराज पाटील, दिग्विजय चव्हाण, निवृत्ती शिंदे,   आकाराम मासाळ, हणमंत गडदे उपस्थित होते.
जत विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच माहयुतीमधील घटक पक्षांनी जत विधानसभेवर दावा केला होता. मात्र माहायुती जागा वाटपात जतची जागा ही भाजपालाच फायनल असल्याचे रघुनाथ कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जतची जागा कोणाला सुटणार?  या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
क्षेत्रीय संघटन मंत्री अजय जमवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना व केलेली विकास कामे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली का हे प्रत्येक पदाधिकारी यांनी पहावे. बूथ सक्षमीकरण करावे, आपली अन्यत्र ओळख असण्यापेक्षा बूथ स्तरावर आपली किती ओळख हे तपासावे. 
जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जत या एकमेव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. मागील काही महिन्यात जत तालुक्यात भाजपने केलेली विकास कामे व पक्ष बांधणीसाठी करण्यात आलेले प्रयत्न यामुळे सध्या भाजपला अत्यंत पोषक वातावरण आहे. आपण विधानसभा लढविण्यास इच्छुक असून पक्षाने संधी दिल्यास या मतदारसंघात कमळ निश्चितपणे फुलेल. 
आमदार पडळकरांना निमंत्रण नाही
जत विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या आ. गोपीचंद पडळकर यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आ. पडळकर हे अन्य मतदार संघातील असल्यामुळे त्यांना जतच्या बैठकीला बोलवण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. आ. पडळकर यांची बैठकीला असलेली अनुपस्थिती हा या बैठकीतील एक चर्चेचा विषय बनली.
डॉ. रवींद्र अरळी यांची माघार
जत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची घोषणा केली. डॉ. रवींद्र आरळी यांच्या माघारीमुळे एक प्रतिस्पर्धी कमी झाला आहे.
  यावेळी विभागीय संवादक योगेश बाचल,विधानसभा पश्चिम मंडळ प्रभारी विश्वास भोसले,जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग,माजी नगरसेवक लक्ष्मण एडके,रयत क्रांती संघटना तालुका अध्यक्ष राजू पुजारी,ओबीसी नेते
शंकर वगरे, महिला मोर्चा जिल्हा सदस्या स्नेहलता जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या अक्काताई दुधाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामण्णा बंडगर, विधानसभा सहसंयोजक रामचंद्र पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रावतराय तेली,अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष मिरासाब मुजावर, बाजार समिती माजी संचालक अभिजित चव्हाण, सरपंच बिराप्पा तांबे,  माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र सावंत, माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी उपस्थित होते.