NC Times

NC Times

जत तालुक्यातील आशा वर्कर,अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रचंड प्रतिसादात ‘सलाम तुमच्या कार्याला’ सोहळा संपन्न!


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी / (विजय चौगुले)
काल विक्रम फाऊंडेशनतर्फे आशा सेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ भव्य,दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि.प.सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी उपस्थित महिला भगिनींसोबत संवाद साधला. या सेविका आपल्या गावाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडत असतात. गरोदर महिला, बालक, वृद्ध, आणि विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांची सेवा करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्यसेवेचा कणा म्हणून या भगिनींकडे आदराने पाहिले जाते.
कुठल्याही व्यक्तीचे लिंग, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती न पाहता गोरगरीब जनतेला आरोग्यसेवा पोहोचवण्याचे अतिशय मोलाचे कार्य या भगिनींनी आपल्या हातून साध्य केले आहे. त्यांच्या या अखंडित सेवेची दखल घेत, विक्रम फाऊंडेशनतर्फे सर्व सेविकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी रिल स्टार ताई संभाजी नुलके यांचा विशेष सत्कार केला. 
या प्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्याला सर्व भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम विस्मरणीय आणि प्रेरणादायक होता.
याप्रसंगी सांगली अप्पर पोलीस अधिक्षक मा.श्रीमती रितू खोखर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प मा.संदीप यादव, जि.आरोग्य अधिकारी मा.विजयकुमार वाघ, बालविकास प्रकल्प अधिकारी प.स.जत श्रीमती शकुंतला निकम, तालुका आरोग्य अधिकारी प.स.जत सौ डॉ.हेमा कांबळे,जिल्हा अध्यक्ष अंगणवाडी संघटना,मा.नदिरा नदाफ,तालुका अध्यक्ष आशा सेविका मा.मिना कोळी, तालुका अध्यक्ष अंगणवाडी संघटना मा.माधुरी जोशी, भारुडकार मा.रामभाऊ हेगडे, येरळा प्रोजेक्ट सोसायटी प्रा.नारायण देशपांडे व हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होते .