NC Times

NC Times

घाटनांद्रेतील श्रावण महिन्यातील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची उत्साही सांगता


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यात गावापासून दोन किलोमीटर दुर डोंगरमाथ्यावर व निसर्गाच्या सानिध्यात आसणार्या‌ परमेश्वर तथा प्रति केदारनाथ मंदिरात घेण्यात आलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणांची सांगता वासकर महाराज-पंढरपुर फडाचे थेट वारसदार राणोजी (मालक) वासकर महाराज यांच्या दृतकाव्य प्रवचनांने व हभप राजेंद्र झरेकर-महाराज-बोरगाव (ता तासगांव) यांच्या काल्याच्या किर्तनांने तसेच महाप्रसाद वाटपाने सांगता करण्यात आली.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारायणा दरम्याने नित्य नियमाने प्रतिमा पूजन,आरती,भजन,कीर्तन,प्रवचन,काकडा,जागर,विणा वादन, ज्ञानेश्वरी वाचन यासारखे कार्यक्रम पार पडले.यावेळी प्रवचना दरम्याने बोलताना राणोजी (मालक) वासकर महाराज म्हणाले की  'वारकरी संप्रदायात दृष्टांत व सिध्दांत या दोन्हीला अत्यंत महत्त्व असुन दृष्टांत सिध्द करण्यासाठी त्याला व्यवहारात प्रचलित असा सिध्दांत द्यावाच लागत असल्याचे'  सांगितले.
        यावेळी हभप गुलाब शिंदे महाराज,सरपंच अमर शिंदे, उपसरपंच सुनील कांबळे, मंजूर फेडरेशनचे माणिकराव जाधव,पोलिस पाटील एकनाथ उर्फ महादेव शिंदे,सिध्दनाथ पतसंस्थेचे माजी व्हा चेअरमन लालासाहेब शिंदे, तंटामुक्तचे कुलदीप शिंदे,माजी उपसरपंच संजय शिंदे,विजय शिंदे (साहेब),राजेंद्र शिंदे,अमृत शिंदे,श्रीचे नित्य पुजेकरी भगवान यादव,आगळगावचे प्रकाश पवार,गोरख पवारसह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.