NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील सर्वोदय हायस्कूला सुझलॉन कडून दुरदर्शन संच


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
सुझलॉन फाऊंडेशन व प्रेरणा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोदय हायस्कूल घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ ) या शाळेला ४३ इंची स्मार्ट टिव्ही अर्थात दुरदर्शन संच देण्यात आला.यावेळी सुझलॉन व प्रेरणा फाऊंडेशनचे अधिकारीवर्ग,शिक्षक,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      यावेळी सुझलॉनचे सीएसआर शिवदास म्हणाले की सुझलॉन फाऊंडेशन हे वेळोवेळी सामाजिक कामात अग्रेसर राहुन मदतीचा हात पुढे करत आहे आणि यापुढेही करत राहू असे सांगितले तर प्रेरणा फाऊंडेशनचे सचिन यादव यांनीही सदर दुरदर्शन संचाचा मुलांच्या ज्ञानार्जनासाठी चांगला उपयोग व्हावा असे आवाहन केले.
     यावेळी सुझलॉनचे शिवदास सर, सेक्शन इनचाॅर्ज गणेश एडके, प्रेरणा फाऊंडेशनचे सचिन यादव, विक्रम मोहिते, मुख्याध्यापक बी एस शिंदे, शिक्षक सर्वश्री साधना धेंडे-कांबळे,प्रकाश वाघमोडे, लक्ष्मण लवटे,जयसिंग बोबडे, दिलीप खाडे,भारत काळे, जयपाल स्वामी,विद्या पाटील, सचिन शिंदे,अदिती सिक्युरिटीचे संतोष शिवाजी शिंदे, बाळासाहेब रास्ते,साहील पवारसह पालक, शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार गणेश एडके यांनी मानले.