NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथे कृषी विभागाच्या वतीने महिला मेळावा संपन्न




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना मासिक मोहीमे अंतर्गत व माविम यांच्याकडून महीला सक्षमीकरण अभियानांतर्गत महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महीलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
         प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तदनंतर कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी बिभीषण दडस यांनी महीलांना गट निर्मीती व व्यवसाय याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.तर महादेव माळी यांनी Pmfme या योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
     तसेच कृषी सहायीका व्ही जी सुदेवाड यांनी कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना,महाडीबीटी मधील योजना,रोजगार हमी योजना,पिक स्पर्धा योजना इत्यादी बाबत महत्वपूर्ण माहिती दिली.तसेच जिल्हा उद्योग निरीक्षक निलेश सावंत यांनी जिल्हा उद्योग विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनेची माहिती दिली.महाविमचे वरीष्ठ जिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे यांनी महीलांना शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा त्याचबरोबर आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून न रहाता स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले.
      सदर कार्यक्रमानंतर Pmfme योजनेंतर्गत प्रिया सगरे यांचें चकली प्रोजेक्ट व सुनिल माळी यांचे डेअरी प्रोजेक्ट ला भेट देवून त्या विषयी मार्गदर्शन केले.यावेळी तालुका कृषी अधिकारी बिभीषण धडस,मंडल कृषी अधिकारी विशाल पवार,महाविमचे कुंदन शिनगारे,जिल्हा उद्योग केंद्राचे निलेश सावंत,कृषी पर्यवेक्षक गणराज कोलगणे,कृषी सहाय्यक गजानन अजेटराव,कृषी सहाय्यीका वर्षा सुदेवाड,एटीएम महादेव माळी,सुहास पाटील,प्रतिक शिंदे,लता कांबळेसह महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.अभार सुहास पाटील यांनी मानले.