NC Times

NC Times

घाटनांद्रे जिल्हा परिषद शाळेत महीला मेळाव्यात 'गुड टच,बॅड टच' याविषयी प्रबोधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महीला मेळावा अगदी उत्साहात संपन्न झाला.अध्य‌क्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील होते.तर यावेळी महीला पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सदर महिला मेळाव्यात मुलींची सुरक्षा तसेच  'गुड टच,बॅड टच'  या संदर्भात दृकश्राव्य माध्यमातून मुलांसह पालकांना माहिती देण्यात आली.त्याचबरोबर शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती,माता पालक समिती,शिक्षक समिती व वाहतूक समिती इत्यादी समित्या बाबत माहिती देऊन त्या बाबत जबाबदारी सांगण्यात आली.
       यावेळी शिक्षीका सौ सुनंदा पाटील यांनी मुलींच्या सुरक्षा बाबत घ्यायची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले व चालू शैक्षणिक वर्षातील आजवरचा‌ शैक्षणिक व गुणवत्तेबाबतचा आढावा घेतला.त्याला सर्वच पालकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
       प्रारंभी पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने उपस्थित सर्वांनीच  'प्लास्टिक मुक्ती' संदर्भात शपथ घेतली.तदनंतर मावळत्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती कदम यांचा नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मेघा शिंदे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.सुरवातीला स्वागत प्रास्ताविक लक्ष्मण मोहिते यांनी केले तर शेवटी सौ कोमल शिंदे यांनी आभार मानले.यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,लक्ष्मण मोहिते,सौ सुनंदा पाटील,सौ कोमल शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सर्वश्री सौ मनिषा खाडे,श्रीमती तेजस्विनी शिंदेसह महीला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.