NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथे चिदंबरदास श्री गुरु गोविंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ येथील कमंडलू नदी लगत असणाऱ्या श्री शिवचिदंबर महास्वामी देवस्थानचे सर्वस्वा चिदंबरदास श्री गुरु गोविंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे शिवचिदंबर सेवा समितीच्या वतीने वैभव पाटील यांनी सांगितले.
मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी कमंडलू नदी लगत असणाऱ्या श्री शिवचिदंबर मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व महाभिषेक करण्यात येणार आहे.तर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर दुपारी १२ पासून महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तसेच सायंकाळी ७ वाजता पुन्हा श्रीची आरती व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
तरी याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी व रक्तदात्यांनी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.तसेच वाढदिवसा निमित्त हार,तुरे,पुष्पगुच्छ,भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत असेही सेवा समितीच्या वतीने वैभव पाटील यांनी सांगितले.